10 lines on Dr BR Ambedkar in Marathi मित्रानो आज आपण या लेखात डॉ बी आर आंबेडकरांवर 10 ओळी पाहणार आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर, अर्थतज्ञ, समाज सुधारक व एक उत्तम विद्यार्थी होते. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.
10 lines on Dr BR Ambedkar in Marathi डॉ बी आर आंबेडकरांवर मराठीत 10 ओळी
10 lines on Dr BR Ambedkar in Marathi (सेट १)
१) बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर हे आहे.
२) बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी एका दलित कुटुंबात झाला.
३) त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भिमाबाई होते.
४) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॅरिस्टर, अर्थतज्ञ, समाज सुधारक व एक उत्तम विद्यार्थी होते.
५) बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हटले जाते.
६) दलित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यात बाबासाहेबांचा मोलाचा वाटा होता.
७) बाबासाहेब आंबेडकर त्याकाळी देशातील उच्चशिक्षित व्यक्तींपैकी एक होते.
८) बाबासाहेबांची विद्यार्थीदशेत असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणासाठी केलेली धडपड अनेकांना प्रेरित करते.
९) 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी आपल्या 3,65,000 अनुयायांसमवेत बौद्ध धर्मात प्रवेश केला.
१०) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे झाले.
10 lines on Dr BR Ambedkar in Marathi (सेट २)
१) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला.
२) त्यांचे वडील रामजी सकपाळ हे सेनादलात सुभेदार पदावर होते.
३) त्यांनी एम.ए., पी.एच.डी., एम.एससी, डी.एससी. अशा अनेक पदव्या संपादन केल्या होत्या.
४) इसवी सन 1906 मध्ये बाबासाहेबांचा रमाबाईंशी विवाह झाला.
५) सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांना मिळावे म्हणून बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथे चवदार तळे येथे सत्याग्रह घडवून आणला.
६) अस्पृश्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी यशस्वी लढा दिला.
७) भारतीय राज्यघटना निर्माण करणाऱ्या समितीचे ते अध्यक्ष होते.
८) त्यांनी ‘भारतातील जातिसंस्था’, ‘जातीचे निर्मूलन’, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ अशी अनेक पुस्तके लिहिली.
९) वयाच्या 65 व्या वर्षी 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.
१०) इसवी सन 1990 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त झाला.