मोबाईलला टीव्हीसोबत कसे जोडावे

How to connect mobile to tv in Marathi नमस्कार मित्रानो, आज बहुतेकांकडे मोबाइल आहे आणि प्रत्येक जण आपल्या मोबाइल वर सिनेमे, सिरियल्स, व्हिडिओस, गेम्स बघण्याचा आनंद घेत असतो, परंतु हे सर्व पाहताना मोबाईल्स ची स्क्रीन लहान असल्यामुळे काही वेला हा आनंद कमी वाटतो आणि आपल्यलाला अनेकदा वाटते कि हि स्क्रीन मोठी असती तर किती बरं झालं असत.

आणि अनेक वेळा विचार मनात विचार येतो कि मोबाइलला टीव्ही Connect करता आली असती तर किती बर झालं असतं पण असे देखील वाटते कि अस केलं तर Mobile किंवा टीव्हीला काही होणार तर नाही ना?, तर मित्रानो मोबाइल आणि Tv जोडणे खूपच सोप्पे आहे. आम्ही या लेखात मोबाइल साध्या, LED किंवा स्मार्ट टीव्हीला कसे कनेक्ट करावे याबद्दल सर्व माहिती Marathi भाषेत सांगितली आहे.

How to connect mobile to tv in marathi
how-to-connect-mobile-to-tv-in-marathi

मोबाईलला टीव्हीसोबत कसे जोडावे How to connect mobile to tv in Marathi

मित्रानो, मोबाईल टीव्हीसोबत जोडणे म्हणजे आपल्याला माहीतच असेलच कि आपली मोबाइलची स्क्रीन टीव्हीवर दिसु लागते. तर मोबाईल टीव्हीसोबत जोडण्यासाठी दोन प्रकारचा पद्धती आहेत. पहिली पद्धत वायर सोबत (USB केबल चा मदतीने) आणि दुसरी पद्धत वायरलेस (Wirelss). या दोन्ही पद्धती अगदी सोपे आहेत फक्त काही सेटीन्ग्स आहे. चलातर मित्रानो, जाणून घेऊ या.

१. USB केबलचा वापर करून मोबाईल टीव्हीसोबत जोडावे (Connect mobile to tv using USB cable)

मित्रानो या पद्धतीमध्ये तुमचा कडे साधा, LED, Smart टीव्ही असलं तरी चालेल परंतु त्या टीव्ही मध्ये USB Port असण गरजेचं आहे आणि तुमच्याकडे USB केबल असली पाहिजेत नसेल तर ती तुम्ही विकत घेऊ शकता जी तुम्हाला १३० रुपये पर्यंत मिळते.

USB पोर्ट नाव ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही हे एक USB पिन जोडण्यासाठी टीव्ही मध्ये असलेले एक होल आहे. त्याचप्रमाणे USB cable हे एक टीव्ही आणि मोबाईल ला जोडायला लागणारी वायर आहे.

अशाप्रकारे जर तुमच्याकडे टीव्हीमध्ये USB पोर्ट आणि तुमचाकडे USB केबल असेल तर सर्वप्रथम तुम्ही खाली दाखविल्या प्रमाणे USB केबल चे एक टोक टीव्ही मधे जोडा आणि दुसरं टोक मोबाइल ला जोडा.

USB केबल जोडून झाल्यांनतर मोबाइल मधे पुढे दिल्या प्रमाणे सेटीन्ग्स करावी लागते, जी तुम्ही एकदा केल्यास नंतरचा वेळेस करण्याची गरज भासत नाही:-

१. मोबाइल मधील सेटीन्ग्स उघडा.

२. सेटीन्ग्स उघडल्यानंतर, तुमचा समोर वेग वेगल्या प्रकारची सेटिंग ची यादी येईल. तर त्यातील “About phone” या पर्यायावर क्लिक करा (दाबा).

३. About phone मध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील तर त्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये जाऊन “Build Number” हे पर्याय शोधा.

४. “Build Number” पर्याय मिळाल्या नंतर त्यावर ८ वेळा क्लिक करा (दाबा). असे केल्यास तुमचा मोबाइल मधील “Developer options” चालू होईल.

आता तुमचा मनात एक प्रश्न येईल कि Developer options, हे काय आहे?, तर Developer options हे मोबाइलला USB चा मदतीने टीव्हीला कनेक्ट करण्यास मदत करते. तर Developer options समजले असेल तर पुढचा स्टेप करा.

५. आता तुम्ही मोबाइल वरील बटण क्लिक करून आपल्या मोबाइल चा होम स्क्रीनवर (मुख्य पृष्ठवर) या आणि पुन्हा मोबाइल सेटीन्ग्स मधे प्रवेश करा.

६. आता सेटीन्ग्स मध्ये आल्या नंतर तुमचा समोर पुन्हा वेगवेगल्या प्रकारची सेटिंग ची यादी येईल, तुम्ही येथे ” Developer options” हे पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा (दाबा).

७. Developer options मध्ये आल्यानंतर येथे तुम्हाला अणेक पर्याय दिसतील त्यामध्ये एक USB Debugging असे पर्याय दिसेल, तर त्यावर क्लिक करा (दाबा) म्हणजेच हे पर्याय बंद असेल त्याला चालू करा. आणि सेटीन्ग्स मधून बाहेर पडा.

अशा प्रकारे आपली मोबाइल मधली सेटीन्ग्स झाली आहे जी पहिल्याच वेळेस करावी लागते, पुढचा वेळेस हि सेटिंग करण्याची गरज पडत नाही.

आणि अशा प्रकारे जेवा तुम्ही सेटीन्ग्स पूर्ण करता, मोबाइल टीव्ही ला कनेक्ट होते आणि मोबाइल वरील चित्रे टीव्ही वर दिसायला लागते.

२. वायरलेस पद्धतीने मोबाईल टीव्हीसोबत जोडावे (Connect mobile to tv wireless)

मित्रानो आपणास माहीतच आहे कि मोबाईलला टीव्हीसोबत जोडण्यासाठी दोन उपाय आहेत वायरलेस आणि दुसरं म्हणजे वायर चा वापर करून.

या दोन्ही मधील वायरलेस हा पर्याय बहुतेकजण निवडतात कारण मोबाईलला टीव्हीसोबत वायरीचा मदतीने म्हणजेच USB केबल चा मदतीने जोडल्यास मोबाइल टीव्हीचा जवळच ठेवावे लागते कारण टीव्ही आणि मोबाइल हे केबल ने जोडलेले असते.

मोबाईलला टीव्हीसोबत वायरलेस पद्धतीमध्ये पुढील प्रमाणे दोन पर्यायाने जोडू शकतो.

१. डोंगळ चा वापर करून (Dongle):-

मित्रानो, हा पर्याय फक्त त्याच टीव्ही साठी वापरता येईल ज्या टीव्ही मधे वरती सांगितल्या प्रमाणे USB पोर्ट असते.

Dongle (डोंगळ) हा शब्द जर नवीन ऐकलं असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. Dongle हा बारीक प्लास्टिकची वस्तू असते जी आपल्याला विकत घ्यावी लागते जी बाजारात ५०० रुपया पर्यंत मिलून जाते.

Credit:- Amazon

जर तुमचा कडे Dongle असेल तर तुम्हाला पुढील प्रमाणे स्टेप्स करा:-

१. Dongle टीव्ही मधील HDMI नावाचे Port (होल) मध्ये टाकावे. डोंगळ वापरण्यासाठी त्याला चार्जिंगची आवश्यकता असते, त्यासाठी त्याझ्या माघे एक होल असते तेथे आपला मोबाइलचा charger लावून चार्जेर चालू करा, चालू केल्यावर Dongle वरील छोटा असलेला led पेटतो.

Credit:- Youtube

२. टीव्ही चालू करा व टीव्हीचे रिमोट टीव्ही समोर पकडून रिमोट वरील HDMI या बटनावर क्लिक करा. टीव्हीवर काही माहिती लिहून येईल.

Credit: Amazon

२. मोबाइल घ्या, आणि Notification bar खाली ओढून तेथील Screencast / Cast हा पर्यायावर ५ सेकंड्स क्लिक करून ठेवा, काहीवेळाने Screencast / Cast पर्याय उघडेल.

३. Screencast / Cast हा पर्याय उघडल्यानन्तर तुम्हाला थोडं थांबावे लागेल, मोबाइल स्क्रीन वर, टीव्ही चा कंपनी किंवा काही वेगळे नाव दिसेल तर त्यावर फक्त क्लिक करा. तुमचा टीव्ही मोबाइल ला कनेक्ट होईल.

अशा प्रकारे मित्रानो Dongle (डोंगळ) चा मदतीने वायरलेस पद्धतीने टीव्ही आणि मोबाइल एकमेकांना कनेक्ट करू शकतो.

२. स्मार्टटीव्ही मधील वायरलेस डिस्प्ले ऑपशन चा वापर करून (Wireless Display):-

वायरलेस डिस्प्ले हा पर्याय फक्त स्मार्ट टीव्ही वापरणाऱ्यांसाठी साठी आहे. जर तुम्ही स्मार्ट टीव्ही वापरात असलं तर तुम्हाला पुढील दिल्या प्रमाणे स्टेप्स कराव्या लागतील:-

१. टीव्ही चालू करून, टीव्हीचा रिमोट समोर धरून, रिमोट वरील Menu हे बटण ने क्लिक करावे (दाबा).

२. Menu बटण क्लिक केल्यावर, टीव्ही वर अनेक पर्याय येतील त्यातील settings वर क्लिक करा (दाबा).

३. Settings वर क्लिक केल्यांनतर, तुम्हाला काही पर्याय दिसतील त्यातील Wireless Display या पर्यायावर वर क्लिक करा, व नंतर तो पर्याय उघडेल, तो उघडून तो Off असेल म्हणजेच बंद असेल त्याला On करा.

अशा प्रकारे टीव्ही वरील सेटीन्ग्स पूर्ण झाली आहे, आता छोटीशी सेटिंग मोबाइल वर देखील करायची आहे.

मोबाइल वरील सेटिंग:-

१. मोबाइल मधील खाली दिल्या प्रमाणे Notification bar (नोटिफिकेशन बार) खाली ओढा. तेथे तुम्हाला Sreencast / Cast (स्क्रीनकास्ट किंवा कास्ट) असे पर्याय दिसतील, त्याला थोडा वेळ दाबून ठेवा, नंतर Sreencast / Cast पर्याय उघडेल.

२. Sreencast / Cast पर्याय उघडल्यानन्तर, हे पर्याय काही वेळ मोबाइलचा आजुबाजुलचे टीव्ही शोधेल, व समोर टीव्हीचा कंपनीचा नाव किंवा दुसरे काही नाव दिसेल, त्यावर क्लिक करा.

अशा प्रकारे, मोबाईल टीव्ही सोबत वायरलेस पद्धतीने जोडली जाईल आणि मोबाइल वरील चित्रे टीव्हीवर दिसू लागतील.

तर मित्रानो, अशा रीतीने आम्ही मोबाइलला टीव्हीसोबत कसे जोडायचे याबद्दल How to connect mobile to tv in Marathi सविस्तर माहिती सांगितली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. जर तुम्हाला हे करण्यात काहीही अडचण आली तर कंमेंट बॉक्स मधे कळवा, आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देण्याच प्रयत्न करू. आणि जर लेख आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्कीच शेअर करा व माहिती पसरावा जेणेकरून त्यांना देखील मदत मिळेल.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment