Information about term insurance in Marathi मित्रहो आज आपण या लेखात टर्म इन्शुरन्स म्हणजे काय आणि त्याविषयीची भरपूर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.

टर्म इन्शुरन्स ही योजना पॉलिसीधारकाला त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट येऊ नये म्हणून निश्चिन्त करते.
यासाठी विमाधारकाला विमाकंपनीकडे ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते व त्याबदल्यात विमाकंपनी विमाधारकाला विशिष्ट कालावधीसाठी आर्थिक कवच प्रदान करते व जर विमा कालावधीमध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर विमा कंपनी पॉलिसीधारकाच्या कुटुंबीयांना पॉलिसी रक्कम प्रदान करते.
मित्रांनो या लेखामध्ये आपण टर्म इन्शुरन्सबद्दल सविस्तर स्वरूपात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? | Information about term insurance in Marathi
टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? Term insurance meaning in Marathi
टर्म इन्शुरन्स (मुदत विमा) ही योजना ठराविक कालावधीसाठी पॉलिसीधारकाच्या कुटुंबीयांना आर्थिक कवच प्रदान करते. यासाठी पॉलिसीधारकाला ठराविक कालावधीसाठी विमा कंपनीकडे प्रीमियम भरावा लागतो.
या प्लानचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मिळणाऱ्या कव्हरेजची रक्कम अधिक असते व त्यामानाने भराव्या लागणाऱ्या प्रीमियमची किंमत कमी असते.
जर विमा कालावधीदरम्यान पॉलीसीधारकाचा मृत्यू झाला तर विमा कंपनीद्वारे पॉलिसीधारकाने नॉमिनी म्हणून अर्जात नमूद केलेल्या व्यक्तीला डेथ बेनिफिट दिला जातो.
ही पॉलिसी इतर पॉलिसीच्यामानाने स्वस्त असते. विमा कालावधी पूर्ण झाल्यावर या पॉलिसीचे नूतनीकरण करता येते पण यावेळी भराव्या लागणाऱ्या प्रीमियम ची रक्कम अधिक असते.
टर्म इन्शुरन्स पॉलिसीची वैशिष्ट्ये:
टर्म इन्शुरन्स मध्ये असणारी काही महत्वपूर्ण वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत:-
१) अधिक कव्हरेज रक्कम
२) कमी प्रीमियम रक्कम
३) ठराविक कालावधीसाठी प्रिमियम भरणे.
४) टर्मचा कालावधी पॉलिसीधारकाला निवडता येतो.
५) लाइफ कवर रक्कम वाढवता किंवा कमी करता येते.
६) प्रीमियमची रक्कम एक रकमी, मासिक, त्रैमासिक, सहा महिन्यांनी किंवा वार्षिक स्वरूपात भरता येते.
६) नॉमिनीला मिळणारे बेनिफिट एकरकमी किंवा मासिक स्वरूपात निवडता येते.
टर्म इन्शुरन्सचे प्रकार Term insurance types:
टर्म इन्शुरन्स पॉलिसी मध्ये पुढील पाच उपप्रकार येतात:-
१) लेव्हल टर्म इन्शुरन्स (Level term insurance):
लेव्हल टर्म इन्शुरन्स मध्ये विम्याची रक्कम पूर्ण कालावधीसाठी सारखीच असते. याच बरोबर यामध्ये भराव्या लागणाऱ्या प्रीमियमची रक्कम देखील विम्याच्या संपूर्ण कालावधीसाठी सारखीच असते.
विमाकालावधीमध्ये जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते.
२) रिटर्न ऑफ प्रिमियम प्लान (Return of premium term insurance):
टर्म इन्शुरन्स मध्ये रिटर्न ऑफ प्रीमियम हा एकच पॉलिसी अशी आहे की ज्यामध्ये तुम्हाला डेथ बेनिफिटसोबत मॅच्युरिटी बेनिफिटचा फायदा घेता येतो.
यामध्ये जर पॉलिसीधारक व्यक्ती पॉलिसी कालावधी संपेपर्यंत जिवंत राहिला तर पॉलिसीधारकाला प्रीमियमची रक्कम मॅच्युरिटी बेनिफिट म्हणून परत दिली जाते.
तसेच जर पॉलिसी कालावधीमध्ये विमाधारकाचा मृत्यू झाला तर नॉमिनीला विम्याची रक्कम दिली जाते पण यावेळी प्रीमियम परत केले जात नाही.
ज्या व्यक्तींना लाईफ कव्हर सोबतच भरलेली रक्कम परत मिळवण्याची इच्छा असते अशा व्यक्तींसाठी हा प्लान अत्यंत उपयुक्त आहे.
टर्म इन्शुरन्सच्या या प्लानव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्लांटमध्ये प्रीमियम परत दिले जात नाही.
म्हणूनच या प्लानमधील प्रीमियमची किंमत इतर टर्म प्लानच्या तुलनेत अधिक असते.
३) इंन्क्रिझींग कव्हर प्लान (Increasing cover term insurance):
इंन्क्रिझींग कव्हर प्लानमध्ये विमा कव्हरची रक्कम सारखी न राहता ठराविक कालावधीनंतर या रकमेमध्ये वाढ होत राहते. त्यामुळे वाढत्या जबाबदारी नुसार तसेच वाढत्या महागाईनुसार लाइफ कव्हरेजची रक्कम वाढवणे देखील सहज शक्य होते.
या प्लान मध्ये दरवर्षी ठरवून दिलेल्या टक्केवारीनुसार विमा रकमेमध्ये वाढ होत राहते. एका ठराविक मर्यादेपर्यंत विमा रक्कम पोहोचल्यानंतर यामध्ये होणारी वाढ थांबते.
उदाहरणार्थ: जर एखाद्या व्यक्तीने 30 वर्षांसाठी दहा लाख विमा रक्कम असलेले इंन्क्रिझींग कव्हर प्लान घेतले व यामध्ये दरवर्षी विमा रक्कम वाढीचा दर पाच टक्के असेल व विमावाढ शंभर टक्के पर्यंत दिली असेल तर, दरवर्षी वाढणारी विम्याची रक्कम पुढील प्रमाणे असेल:-
वर्ष | विमा रक्कम | वर्ष | विमा रक्कम |
---|---|---|---|
१ | १०५०००० | ११ | १५५०००० |
२ | ११००००० | १२ | १६००००० |
३ | ११५०००० | १३ | १६५०००० |
४ | १२००००० | १४ | १७००००० |
५ | १२५०००० | १५ | १७५०००० |
६ | १३००००० | १६ | १८००००० |
७ | १३५०००० | १७ | १८५०००० |
८ | १४००००० | १८ | १९००००० |
९ | १४५०००० | १९ | १९५०००० |
१० | १५००००० | २० | २०००००० |
यानंतर पुढील दहा वर्षासाठी असलेली कव्हर ची रक्कम वीस लाख इतकीच असेल.
यामध्ये असणारे प्रीमियमची रक्कम ही सारखी राहते किंवा वाढते हे तुमच्या विमा कंपनीवर अवलंबून असते
४) डिक्रीजींग कव्हर प्लान (Decreasing cover term insurance):
या प्लानमध्ये प्रीमियमची रक्कम इतर टर्म प्लानच्या मानाने कमी असते. या प्लानचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असणारी कव्हरेजची रक्कम पॉलिसी कालावधीमध्ये ठराविक रकमेने कमी होत जाते.
बहुतेकदा एखाद्या कर्जापासून विमाधारकाच्या पश्चात परिवारावर आर्थिक संकट येऊ नये म्हणून ही पॉलिसी मदत करते. त्यासाठी तुम्ही कर्ज काढलेल्या बँकेशी संबंधित विमा कंपनीकडून ही पॉलिसी घेता येते. त्यामुळे जशी तुमची कर्जाची मुद्दल कमी होत जाते तसे विमा कव्हरेज देखील कमी होत जाते व त्यामुळे जर पॉलिसीधारकाचा पॉलिसी कालावधी दरम्यान मृत्यू झाला तर या पॉलिसी कव्हरमधून कर्जाची रक्कम फेडता येते.
या पॉलिसी मध्ये असणारी प्रीमियमची रक्कम ही विम्याच्या पूर्ण कालावधीसाठी सारखीच असते.
५) मंथली इनकम कव्हर प्लान (Monthly income cover insurance):
बहुतेक इन्शुरन्स प्लानमध्ये मिळणारे डेथ बेनिफिट हे एकरकमी दिले जाते. त्यामुळे नॉमिनीकडून या रकमेचे व्यवस्थापन अयोग्य पद्धतीने होऊ नये म्हणून ही योजना उपयुक्त ठरते.
या योजनेमध्ये मिळणारे डेथ बेनिफिट हे दर महिन्याला मासिक उत्पन्नाच्या स्वरूपात नॉमिनीला दिले जाते.
तसेच यातीलच काही पॉलिसीमध्ये डेथ बेनिफिटची काही रक्कम एकरकमी दिली जाते तर उर्वरित रक्कम मासिक उत्पन्नाच्या स्वरूपात दिली जाते.
टर्म इन्शुरन्स साठी लागणारी साधारण कागदपत्रे:
सर्वसाधारणपणे टर्म इन्शुरन्स साठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत:-
१) ओळखपत्र: मतदान कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना (यापैकी कोणतेही एक)
२) पत्त्याचा पुरावा: पत्ता नमूद केलेले कोणतेही सरकारी ओळखपत्र, विज बिल, टेलिफोन बिल, गॅस बिल (यापैकी कोणतेही एक)
३) पासपोर्ट साईज फोटो
४) उत्पन्नाचा पुरावा (नोकरी करणाऱ्यांसाठी):
अ ] मागील तीन महिन्याची सॅलरी स्लिप
ब ] पगार जमा होत असलेल्या खात्याचे मागील तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट
क ] फॉर्म-16 ची प्रत
ड ] मागील दोन वर्षाची आयकर परताव्याची प्रत
५) उत्पन्नाचा पुरावा (स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी):
अ ] मागील दोन वर्षातील आयकर परतावा परत
ब ] फॉर्म 26 AS
क ] मागील दोन वर्षाचा प्रॉफिट लॉस अकाउंट व बॅलन्स शीट
याव्यतिरिक्त विमा कंपनी त्यांना आवश्यक असणारी असणारी इतर कागदपत्रे मागू शकते.
अशाप्रकारे आम्ही Information about term insurance in Marathi या लेखात टर्म इन्शुरन्स म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे.
हे देखील वाचा: