माझी मायबोली मराठी निबंध 2023 | Majhi maayboli Marathi nibandh

मित्रांनो तुम्ही Majhi maayboli marathi nibandh शोधत आहात का ? तर ह्या लेखात आम्ही माझी मायबोली या विषयावर पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हा निबंध आम्ही शब्द संख्येनुसार 100, 200 व 500 अशा तीन प्रकारांमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रत्येकाला आपली मातृभाषा प्रिय असते, किंबहुना त्याची तिच्याशी नाळ जोडली गेली असते तर अशाच महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या आपल्या मायबोली बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Majhi maayboli marathi nibandh

माझी मायबोली मराठी निबंध Marathi amchi maayboli nibandh

मराठी असे आमची मायबोली मराठी निबंध Majhi maayboli marathi nibandh ( १०० शब्दांत )

मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून ओळख जरी असली असली तरी तिचा विस्तार हा सातासमुद्रापलीकडे झाला आहे. मराठीचा उगम हा संस्कृत पासून झाला असावा असे सांगितले जाते. म्हाईंभट्टानी लिहिलेले लीलाचरित्र हा या भाषेतील पहिला ग्रंथ.

त्यानंतर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीचा या प्रवाहात समाविष्ट केला. यानंतर रामदास स्वामींचा दासबोध, तुकारामाचे अभंग, एकनाथांचे भारूड यांनी हा प्रवाह वृद्धिंगत होत गेला. अशा प्रकारे ही भाषा तिचे स्वरूप बदलत पुढे जात राहिली.

आताही प्रत्येक प्रदेश, प्रांतानुसार मराठीची विविध रूपे पाहायला मिळतात. कोकणात कोकणी, मालवणी, विदर्भात वर्‍हाडी, कोल्हापुरात कोल्हापुरी, गोव्यात कोकणी असे अनेक स्वरूपात बोलली जाते. भाषेचे स्वरूप वेगळे असले तरी गोडवा मात्र तसाच राहतो.

म्हणूनच अशा या समृद्ध भाषेचा गौरव करताना, संत ज्ञानेश्वर लिहितात की,

Majhi maayboli marathi nibandh

मराठी असे आमची मायबोली मराठी निबंध Majhi maayboli marathi nibandh ( २०० शब्दांत )

या सुंदर ओळीतून सुरेश भट यांनी आपल्या मातृभाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला आहे. उराउरात स्पंदन करणारी भाषा, मराठी भाषिकांमध्ये जाती, धर्म, पंथ यावरून भेदभाव करीत नाही.

ती महाराष्ट्रातल्या दरीदरीत हिंडते, येथल्या वनावनात गुंजते, नभातून बरसते तसेच इथल्या नद्यांमध्ये वाहते. अशी ही चराचरात वास्तव्य करणारी भाषा म्हणजेच माझी मायबोली मराठी.

अशा या मराठी भाषेचा महिमा ज्ञानेश्वरांनी ओव्यांमधून गायला, नामदेव तुकारामांनी अभंगातून परमेश्वरचरणी वाहिला. ती एकनाथांच्या भारूडातून गायली गेली तर कधी शाहिरांच्या पोवाड्यातुन झलकली. स्वातंत्र्यकालात टिळकांच्या लेखणीतून कडाडली तर कधी लावणीच्या लावण्यरसात शृंगारली गेली. कवी कुसुमाग्रजांच्या काव्यातून बरसली गेली तर कधी पु. लं.‌ च्या विनोदातून हसवून गेली.

महाराष्ट्राची राज्यभाषा असलेली ही भाषा, मराठी भाषिकांनी देशभरात नाही तर जगभरात पोहोचवली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात मात्र तेरा वर्ष लढली, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतीत कडाडली, अन अखेर १ मे १९६० रोजी भारताच्या बावीस अधिकृत भाषांमध्ये स्थान मिळवून तिने मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य स्थापन केले व त्यानंतर तिला राजाश्रय मिळाला.

महाराष्ट्र शेजारील राज्यातही तिचे अस्तित्व जाणवते. दक्षिण गुजरात, उत्तर कर्नाटक, उत्तर आंध्रप्रदेश, दक्षिण मध्यप्रदेश या ठिकाणीही मराठी भाषेचा व्यवहारात व संभाषणात वापर होतो.
म्हणूनच आपली मातृभाषेचा महिमा सांगताना कुसुमाग्रजांनी तिच्या समृद्धीपणाचा गौरव करताना लिहिले की,

Majhi maayboli marathi nibandh

अशी ही समृद्ध असलेली, पर्वतावरून उंच प्रतिभा असलेली मराठी ही आपली मातृभाषा आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

मराठी असे आमची मायबोली मराठी निबंध Majhi maayboli marathi nibandh ( ५०० शब्दांत )

या ओळीतून संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महती अत्यंत सुंदर शब्दात मांडली आहे. मराठीचे वर्णन करताना माऊली सांगतात की माझी मराठी ही अमृताहुनही गोड आहे.

भाषा ही संवाद साधण्याचे व व्यवहार पार पडण्याचे साधन आहे. त्यात प्रमाण आणि बोली असे प्रकार पडतात. प्रमाणभाषा ही प्रशासकीय कामांसाठी तर बोलीभाषा ही संवादासाठी व व्यवहारासाठी वापरली जाते‌. देश तसा वेश याप्रमाणे दर १२ कोसावर भाषेचे स्वरूप बदलते. म्हणूनच प्रत्येक भाषा मैलामैलावर वेगळी वळणे घेते.

मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या प्रमाण भाषेची प्रांतानुसार वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. कोकणी, घाटी, व्हराडी, अहिराणी, खान्देशी ही मराठीची निराली रूपे. प्रत्येक भाषेत तिचा तिचा वेगवेगळापणा पण गोडवा मात्र तसाच राहतो.

संत ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमाग्रजांपर्यंत अनेक काव्यसंग्रह रचली गेली. यातून वृद्धिंगत होत जाणाऱ्या भाषेची प्रचिती येते. इसवी सन १२७८ मध्ये म्हाईंभटांनी लीलाचरित्र नावाचा पहिला काव्यसंग्रह लिहिला. त्यातल्या व सध्याच्या मराठीत खूप फरक आहे. मराठीचा उगम संस्कृत पासून झाला अशी समज आहे. मराठीने संस्कृत मधून अनेक शब्द जसेच्या तसे व काही थोडा बदल करून घेतले गेले.

मराठी भाषा ही संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, महाराष्ट्री अशी विकसित होत गेली. यातच गाथा सप्तशती, लीलाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधु हे ग्रंथ लिहिले गेले. भाषा जशी प्रांतानुसार बदलते तसेच कालानुसार तिच्यात बदल घडतात. इतर भाषांचा त्यावर प्रभाव पडून त्यातील शब्दांची मूळ भाषेत भर पडते. त्यामुळे भाषेचा उगम सांगणे निश्चितच कठीण.

या काव्यपंक्तीतून कवी कुसुमाग्रजांनी सांगताहेत की संत ज्ञानेश्वरांनी जिचा अमृताशी तुलना करून उद्धार केला, ती मराठी भाषा अमृताचा गोडवा घेऊन जगभरात तिचा विस्तार करेल.

महाराष्ट्रातील राज्यभाषा असलेली मराठी, गोवा तसेच दक्षिन गुजरात, उत्तर कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश तसेच भारताबाहेरही विस्तारली गेली. इस्राईल देशातील टेल अविव विद्यापीठ तसेच दिल्लीतील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही मराठीचे शिक्षण दिले जाते.

अशा वैविध्यपूर्ण व जगभर विस्तारलेली भाषा आपली मातृभाषा आहे. असे सांगताना कवी सुरेश भट सांगतात की,

स्वातंत्र्यानंतरच्या तेरा वर्ष मात्र मराठी भाषिकांची परवड झाली व अखेर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला यश येऊन मराठी ही राज्यभाषा असलेल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली व मराठी भाषेला राजाश्रय मिळाला.

अशा या ऐतिहासिक वारसा असलेल्या मराठी भाषेचे अस्तित्व टिकावे व ती वृद्धिंगत व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील असले पाहिजे.

लहान मुल हे आईच्या संपर्कात राहून मोठा होतो त्यामुळे त्याच्या आईची जी भाषा असते तिला त्याची मातृभाषा म्हटले जाते. मातृभाषेतील शिक्षणामुळे मुलांचा मेंदू लवकर विकसित होऊन विचार करायला लागतो नाहीतर पुन्हा दुसरी भाषा शिकण्यात, समजण्यात अडकून राहतो. त्यामुळे मातृभाषेत प्राथमिक शिक्षण प्रत्येकाची गरज आहे.

त्यामुळे मराठी भाषिक असलेल्या पालकांच्या पाल्याने किमान प्राथमिक शिक्षण मराठीत घेतले पाहिजे, असा कवी कुसुमाग्रज यांनी हट्ट धरला.
कवी कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिवस 29 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

या दिनाचा मुख्य उद्देश, मराठी भाषेचे मुल अस्तित्व टिकावे असा आहे. त्यासाठी नाटके, काव्य संमेलन, व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. मराठी भाषकाकडून चाललेल्या मातृभाषेची परवड थांबावी व मराठी भाषेवर वारंवार इंग्रजी व इतर भाषांचा प्रभाव कमी व्हावा हे याचे मूळ उद्देश आहे.

यासाठी मराठी भाषिकांच्या मनात मातृभाषेविषयी असलेली आस्था जागी होणे गरजेचे आहे. यासाठी कवी कुसुमाग्रज सांगतात की,

Majhi maayboli marathi nibandh

म्हणून आपल्या मायबोली मराठीचे अस्तित्व टिकवणे हे आपले मराठी भाषिक म्हणून कर्तव्य आहे.

हे सुद्धा अवश्य वाचा:

Share on:

Leave a Comment