मनोज मुकुंद नरवणे संपूर्ण माहिती

मित्रांनो आज आपण या लेखात भारतीय लष्कर दलाचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Manoj mukund naravane information in marathi

मनोज मुकुंद नरवणे संपूर्ण माहिती | Manoj mukund naravane information in marathi

Manoj Mukund Naravane biography in marathi:

संपूर्ण नाव:मनोज मुकुंद नरवणे
जन्म:22 एप्रिल 1960 (पुणे, महाराष्ट्र)
विभाग:भारतीय लष्कर
रॅंक:लष्करदल प्रमुख (Chief of Army Staff)
युनिट:७ सिख लाईट इन्फंट्री
पुरस्कार:परम विशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल इत्यादी.
शिक्षण:नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथून पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिफेन्स स्टडी, M. Phil.

जन्म व सुरुवातीचा काळ:

मनोज मुकुंद नरवणे यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे येथे 22 एप्रिल 1960 रोजी झाला. त्यांचे वडील मुकुंद नरवणे हे भारतीय वायुदलामधील विंग कमांडर या पदावरून निवृत्त झाले होते. तसेच त्यांची आई सुधा नरवणे या ऑल इंडिया रेडिओमध्ये अनाऊन्सर म्हणून कार्यरत होती.

जनरल नरवणे यांना पेंटिंग, गार्डनिंग तसेच योगासनांची आवड आहे.

शिक्षण:

जनरल मनोज नरवणे यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशाळा येथे पूर्ण केले‌. यानंतर त्यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी, पुणे येथे सैन्य शिक्षण पूर्ण केले.

त्यांनी मद्रास विश्वविद्यालय चेन्नई येथून एम. ए. तसेच एम. फिल. या पदवी संपादन केल्या.

भारतीय लष्करामधील कारकीर्द:

जनरल मनोज नरवणे यांची ७ जुन १९८२ रोजी भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांनी आपले सैन्य प्रशिक्षण नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे व नॅशनल मिलिटरी अकॅडमी येथे पूर्ण केले होते. 1982 मध्ये लेफ्टनंट ते आतापर्यंत लष्करप्रमुख असे विविध पदभार यशस्वीरीत्या सांभाळले.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना 2015 मध्ये सेना मेडल तसेच विशिष्ट सेवा मेडल या सन्मानांनी गौरविण्यात आले. तसेच 2017 मध्ये अतिविशिष्ट सेवा मेडल व त्यानंतर 2019 मध्ये परम विशिष्ट सेवा मेडल या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

31 डिसेंबर 2019 या दिवशी जनरल बिपिन रावत यांच्यानंतर चीफ ऑफ द आर्मी स्टाफ या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली व भारतीय लष्कराचे सत्ताविसावे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

विविध पदभार:

जनरल मनोज नरवणे यांच्या आतापर्यंतच्या भारतीय लष्कराच्या कार्यकाळामध्ये स्वीकारलेले विविध पदभार पुढीलप्रमाणे आहे :

१) लेफ्टनंट : (७ जुन १९८२)
२) कॅप्टन : (७ जुन १९८५)
३) मेजर : (७ जुन १९९१)
४) लेफ्टनंट कर्नल : (३१ डिसेंबर २००२)
५) कर्नल : (१ फेब्रुवारी २००५)
६) ब्रिगेडियर : (१९ जुलै २०१०)
७) मेजर जनरल : (१ जानेवारी २०१३)
८) लेफ्टनंट जनरल : (१० नोव्हेंबर २०१५ )
९) जनरल : (३१ डिसेंबर २०१९)

विविध पुरस्कार:

जनरल मनोज नरवणे यांना त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत मिळालेले विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत.

१) सेना मेडल
२) विशिष्ट सेवा मेडल
३) अतिविशिष्ट सेवा मेडल
४) परम सेवा मेडल
५) सामान्य सेवा मेडल
६) स्पेशल सर्विस मेडल
७) ऑपरेशन पराक्रम मेडल
८) सैन्य सेवा मेडल
९) विदेश सेवा मेडल
१०) ५० एनिवर्सरी ऑफ इंडिपेंडेंस मेडल
११) थर्टी इयर लॉंग सर्विस मेडल
१२) ट्वेंटी इयर्स लॉंग सर्विस मेडल
१३) नाईन इयर्स लॉंग सर्विस मेडल

विचारले जाणारे प्रश्न:

  1. जनरल मनोज नरवणे यांचे वय किती आहे?

    ६१ वर्ष (जन्म: २२ एप्रिल १९६०).

  2. जनरल मनोज नरवणे हे कोण आहेत?

    जनरल मनोज नरवणे हे भारतीय लष्करदल प्रमुख (Chief of Army staff) आहेत.

  3. जनरल मनोज नरवणे यांचे पूर्ण नाव काय आहे?

    मनोज मुकुंद नरवणे.

  4. जनरल मनोज नरवणे यांचे शिक्षण काय आहे?

    नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुणे येथून पदवीधर, पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिफेन्स स्टडी, M. Phil.

  5. जनरल मनोज नरवणे यांचा जन्म कुठे झाला?

    जनरल मनोज नरवणे यांचा जन्म पुणे, महाराष्ट्र येथे झाला.

अशाप्रकारे मित्रहो आम्ही manoj mukund naravane information in marathi या लेखात मनोज नरवणेबद्दल सर्व माहिती सांगितली आहे. जर आपल्याला हा लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

Share on:

Leave a Comment