Mother teresa quotes in marathi भारतरत्न व नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांनी त्यांचे एकंदरीत जीवन भारतातील गरीब व आजारी व्यक्तींच्या सेवेत व्यतीत केले. कोलकाता येथे राहत असताना तिथल्या कुष्ठरोगी व्यक्तींची त्यांनी निस्वार्थ सेवा केली.
गरिबांविषयी त्यांच्या मनात प्रेम काळजी व सहानुभूती होती. म्हणूनच या लेखात आम्ही सेवा व परोपकार यांच्या पुरस्कर्त्या भारतरत्न मदर तेरेसा यांचे काही विचार नमूद करण्याचा प्रयत्न केला आहे.

मदर तेरेसा यांचे विचार मराठीत Mother teresa quotes in marathi
१) प्रेम आणि दया चे शब्दही बोलायला अगदी सोपे असतात पण त्याचे पडसाद अत्यंत खोलवर उमटतात.
२) तुम्ही 100 गरजूंना अन्न नाही देऊ शकलात तर ठीक आहे पण एकाला तरी देण्याचा नक्की प्रयत्न करा.
३) जिथे जाल तिथे प्रेम पसरवण्याचा प्रयत्न करा. तुमच्यापाशी येणारी प्रत्येक व्यक्ती ही आनंदी होऊन परतायला हवी.
४) भूतकाळ संपला आहे उद्याचा दिवस उजाडायला अजूनही वेळ आहे आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे त्यामुळे सुरुवात ही आत्ताच करायला हवी.
५) खरं प्रेम हे मोजता येत नाही ते फक्त केल जातं.
६) आपल्यातील प्रत्येकजण मोठी गोष्ट घडवू शकत नाही पण आपण प्रत्येक छोटी गोष्ट अत्यंत प्रेमाने करू शकतो.
७) प्रेम व आपुलकीची भूक भागवणे हे पोटाची भूक भागवण्यापेक्षा कठीण काम आहे.
८) तुम्ही जागतिक शांततेसाठी काय करू शकता? तर घरी जा व आपल्या कुटुंबावर प्रेम करा.
९) नको असलेल्या गोष्टी देऊन टाकल्या की ते दान ठरत नाही.
१०) देव सर्वत्र व चराचरात आहे तसेच त्याच्याशिवाय आपले अस्तित्व शक्य नाही.
११) एखादी गोष्ट मिळवण्याआधी त्या गोष्टीची तीव्र इच्छा निर्माण होणे गरजेचे असते.
१२) खरे प्रेम हे ते जोपर्यंत दुखावले जात नाही तो पर्यंत केले जाते.
१३) डॉक्टर हे शरीरावरील जखम बरी करतात तर उत्तम संगीत हे शरीरातील आत्मा सुखावतात.
१४) आयुष्यातील प्रत्येक क्षण हा मौल्यवान आहे, ते वाया घालवू नका.
१५) यशस्वी होण्याचा मार्ग म्हणजे आपण दुसऱ्याला दिलेल्या सल्ल्यानुसार स्वतः काम करणे.
१६) ते फक्त स्वतःसाठी जगले जाते त्याला आयुष्य म्हणत नाहीत.
१७) जेव्हा तुमच्याकडे काहीच नसते तेव्हा पुन्हा सुरुवात करून मिळवण्यासारखे बरेच काही असते.