[मराठी] Play store ऍप बद्दल मराठी मध्ये माहिती | Play store app information in Marathi

Play store app information in Marathi मित्रानो आपण प्ले स्टोरच नाव ऐकून आहात पण त्याझ्याविषयी माहिती शोधात आहात का? तुम्हाला माहीतच असेल प्ले स्टोर अँड्रॉइड मोबाइल, टेबलेट व अँड्रॉइड टीव्ही वापरकर्त्यांसाठी असलेले ऍप्लिकेशन आहे जे खूप उपयोगी आहे.

या app द्वारे आपण मोबाइल मध्ये विविध पुस्तके, गेम्स, ॲप्लिकेशन्स, सिनेमे घेऊ शकतो. तर या बद्दल आम्ही हा लेख लिहला आहे जो तुम्हाला Play store ची सर्व information व त्याचे वेगवेगळे फायदे Marathi मध्ये समजाऊन सांगेल. चला तर मग मित्रानो जाणून घेऊया या ॲप बद्दल.

Play store app information in marathi
play-store-app-information-in-marathi

प्ले स्टोअर ऍप बद्दल मराठी मध्ये माहिती Play store app information in marathi

Play store हे एक Google कंपनीचे एक application आहे जे २२ ऑक्टोबर २००८ रोजी चालू झाले आहे. हा ॲप्लिकेशन Android वापरकर्त्यांसाठी आहे म्हणजेच Android मोबाइल, टीव्ही, टॅबलेट इत्यादी.

Play store चे उपयोग

Play store चा वापर आपण पुढील गोष्टी साठी करू शकतो:-

  1. विविध प्रकारचे शैक्षणिक, मनोरंजक, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन बिल भरण्यासाठी चे आणि अजून भरपूर प्रकारचे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करू शकतो.
  2. अनेक प्रकारचे गेम्स डाउनलोड करू शकतो.
  3. विविध भाषेतील सिनेमे डाउनलोड करू शकतो.
  4. अनेक प्रसिद्ध आणि विविध प्रकारचे पुस्तके डाउनलोड करू शकतो.

प्ले स्टोर कसे इन्स्टॉल करावे Play store app install?

शक्यतो Play store हा application सर्व मोबाईल्स मध्ये मोबाइल कंपनी कडूनच दिला गेला असतो पण जर आपल्या मोबाइल मध्ये नसल्यास आपण आपल्या मोबाइल मधील Browser मधून Google play चा वेबसाइट वर भेट देऊन तेथून डाउनलोड करू शकता.

Play store वर account कसे बनवावे?

जेंव्हा तुम्ही Play store सुरु करता तेंव्हा तुम्हाला Gmail Account लागते जर तुमचा कडे अगोदरच Account असेल तर तुम्ही त्याचे details तेथे टाकून Play store सुरु करू शकता.

परंतु अकाउंट नसल्यास तुम्हाला तेथे Gmail account उघडण्यासाठी Create account असा पर्याय असतो त्यावर क्लिक करून तुम्ही Gmail account उघडू शकता किंवा तुम्ही Google वर भेट देऊन सुद्धा Gmail account उघडू शकता फक्त तुम्हाला Gmail account उघडताना वापरलेले Password आणि Id लक्षात ठेऊन Play store मध्ये टाकावे लागते.

Play store light आणि Dark मोड

मित्रानो play store हे ॲप्लिकेशन बरीच वर्ष light mode मध्ये उपलब्ध होते परंतु काही वर्षा पूर्वीपासून Dark mode सुद्धा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झालं आहे. Dark mode चे फायदे असे आहेत कि यामुळे मोबाइल स्क्रीन कडे बघत असताना डोळ्यावरील येणारा ताण कमी होतो, मोबाइल स्क्रीन कडून डोळ्यावर येणाऱ्या निळ्या किरणांची प्रखरता कमी होते, त्याचप्रमाने हे मोबाइल ची Battery life सुद्धा वाढवते.

Play store वर ॲप किंवा गेम्स कसे शोधायचे?

Play store वर ॲप्लिकेशन किंवा गेम्स शोधण्यासाठी तुम्हाला खाली दिल्या प्रमाणे ॲप्लिकेशन चा वरती Type करण्यासाठी जागा असते तेथे तुम्ही हवं ते type करून Mobile Keypad वरती खालचा कोपऱ्यात उजव्या बाजूस एक भिंगासारखे चिन्ह असते, त्यावर क्लिक करून तुम्ही शोधू शकता.

त्याच प्रमाणे तुम्ही Play store वर Voice search देखील करू शकता, म्हणजेच या मध्ये तुम्ही मोबाइल समोर बोलूनसुदधा हवे ते शोधू शकता, यासाठी ॲप्लिकेशनचा वरचा बाजूस एक Mic सारखे चिन्ह असते, त्यावर क्लिक करून तुम्ही मोबाइल समोर बोलून हवं ते शोधू शकता.

Play store चा वापर मोफत आहे?

Play store हा ॲप पूर्णपणे फ्री नाही आहे. यातील काही गोष्टी फ्री आहेत तसेच काही गोष्टींसाठी घेण्यासाठी पैसे भरावे लागते.

Play store वरून ॲप किंवा गेम्स कसे इन्स्टॉल करावे?

मित्रानो तुम्हाला हवे ते ॲप किंवा गेम्स इन्स्टॉल करण्यासाठी सर्वप्रथम वरील सांगितल्याप्रमाने हवे ते ॲप किंवा गेम्स शोधा व पुढील प्रमाणे स्टेप्स करा:-

१. हवे ते ॲप किंवा गेम्स शोधून झाल्यानंतर तुमचा समोर त्या ॲप्लिकेशन सोबत बाकी संबंधीत ॲप्लिकेशनची असे भरपूर मोठी यादी दिसेल. त्यावर तूम्हाला हवे असलेल्या ॲप्लिकेशन वर क्लिक करा.

२. ॲप्लिकेशन वर क्लिक केल्यांनतर समोर त्याचे नाव, logo व त्याखाली एक Install असा ऑपशन दिसेल. तर त्यावर क्लिक करा. अशा प्रकारे हवे ते ॲप किंवा गेम्स मोबाइल मध्ये इन्स्टॉल होईल.

प्ले स्टोर वरील Play protect फिचर

Play protect हे प्लेस्टोर वरील एक सुविधा आहे जी प्लेस्टोर वरील ॲप्लिकेशन download करण्या अगोदर आणि त्याचप्रमाणे डाउनलोड केल्यानंतरही नियमितपणे Scan करत असते आणि आपल्या मोबाइलला धोकादायक ॲप्लिकेशन पासून सुरक्षित ठेवते.

प्ले स्टोर वरील Parental control फिचर

हे एक प्ले स्टोर मधील पर्याय आहे ज्याचा वापर करून आईवडील मुलाच्या प्लेस्टोर चा वापरावर control ठेऊ शकतात.

Play store वरून पैसे कसे कमवू शकतो?

मित्रानो तुम्हाला प्रश्न पडला असेल हे काय पैसे कमवू शकतो, कसे काय? कारण आम्ही तर Play store वर फक्त games, ॲप्लिकेशन्स घेण्यासाठी वापरात होतो. मग यातून पैसे कसे कमवू शकतो?

मित्रानो तुम्ही अनेकदा Application वापरताना पहिलेच असेल कि Application वापरताना त्याचा खालचा बाजूस advertisements दिसत असतात. तर त्याच advertisements चा मदतीने आपण play store मधून पैसे कमवू शकतो.

मित्रानो यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन बनवून आणि त्यावर advertisements लावून त्याला Play store वर publish करावे लागते.

तर यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम पहिले असे Application बनवावे लागेल जे लोकांना आवडेल, जे लोकांची मदत करेल आणि भरपूर लोक त्या Application ला Play store वरून डाउनलोड करतील.

आता तुम्हाला असे प्रश्न पडले असेल कि Application कसे बनवायचे? तर मित्रानो अँलिकेशन बनवण्यासाठी तुमच्याकडे programing चे शिक्षण असणे गरजेचे आहे ते असल्यास तुम्ही computer चा मदतीने Application बनवू शकता. किंवा तुम्ही तुमचा ओळखीत किंवा काही companies असतात जे आपल्याला हवे असलेले Application बनवून देतात.

Application बनवल्यानंतर तुम्हाला तुमचा Application वर advertisements लावण्यासाठी advertisements लावणाऱ्या कंपनीकडे अर्ज करावे लागेल. व advertisements लागल्यानंतर तुम्ही Application ला play store वर टाकू शकता.

जसजसे लोक तुमचा Application डाउनलोड करतील तसतसे तुम्हाला advertisements चे पैसे मिळायला लागतील. पुढे जाऊन तुम्ही Application खूप डाउनलोड होऊ लागल्यास डाउनलोड करण्यासाठी देखील पैसे ठेऊ शकता त्यामुळे त्यातूनही तुम्ही पैसे कमावू शकता.

अशा रीतीने मित्रहो आम्ही तुम्हाला Play store app information in Marathi बद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला या बाबतीत काही विचारायचे असेल किंवा काही समजले नसेल तर तुम्ही कंमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आम्ही तुमचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला हा प्ले स्टोर बद्दलचा लेख आवडला असेल तर share करायला विसरू नका.

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment