10 lines on coronavirus in Marathi मित्रहो आज आपण या लेखात कोरोनाव्हायरस वर 10 ओळी पाहणार आहोत. कोरोना विषाणू हे एक जागतिक महासंकट आहे. सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रतिबंधक लसी तयार केल्या गेल्या आहेत. चला तर मग अधिक माहिती जाणून घेऊया.
कोरोनाव्हायरस वर 10 ओळी 10 lines on coronavirus in Marathi
कोरोनाव्हायरस वर 10 ओळी (सेट १)
१) कोरोना हा अत्यंत वेगाने पसरणारा व मानवी आरोग्यासाठी घातक असणारा विषाणू आहे.
२) 2019 मध्ये सुरू झालेल्या या व्हायरसच्या फैलावाने 2020 मध्ये जागतिक महामारीचे स्वरूप घेतले.
३) या व्हायरसपासून होणाऱ्या आजाराची सुरुवात चीन मधील वुहान शहरापासून झाली.
४) या आजारामुळे अनेक व्यक्तींना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे.
५) हा विषाणू नाकावाटे, तोंडावाटे तसेच डोळ्यावाटेदेखील शरीरामध्ये प्रवेश करतो.
६) कोरोना हा विषाणू मानवी शरीरामध्ये श्वसनासंदर्भातील अनेक आजार निर्माण करतो.
७) कोरोना संक्रमित व्यक्तीच्या शिंकांमधून हे विषाणू सर्वत्र पसरतात व त्या परिसरातील वस्तूंवर ते बराच काळ जिवंत राहतात.
८) त्यामुळे या विषाणुंपासून आपले संरक्षण करण्यासाठी बाहेरून आल्यावर अंघोळ करणे तसेच सॅनीटायझरचा वापर करणे गरजेचे आहे.
९) सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केल्यास तसेच एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखल्यास या विषाणूचा संसर्ग रोखणे शक्य होते.
१०) सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक प्रतिबंधक लसी तयार केल्या गेल्या आहेत.
कोरोनाव्हायरस वर 10 ओळी (सेट २)
१) कोरोना विषाणू हे एक जागतिक महासंकट आहे.
२) या आजारामुळे जगभरात एकूण ४५.५ लाख व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला आहे.
३) हा अत्यंत वेगाने पसरणारा आजार आहे व आतापर्यंत 22 कोटी लोकांना याची लागण झाली आहे.
४) या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉक डाऊन या पर्यायाचा वापर करून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
५) यासाठी बाजारपेठा, शाळा, कॉलेज, सरकारी व खाजगी कंपन्या, ऑफिस बंद ठेवण्यात आले होते तसेच जमावबंदी संचारबंदी अशा विविध पर्यायांचा वापर केला गेला.
६) कोव्हीड संदर्भातील सर्व नियम पाळून या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होत आहे.
७) स्वच्छतेसंदर्भातील नियमांचे पालन करणे, मास्क वापरणे, सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करणे अशा सोप्या सोप्या गोष्टींमधून आपल्याला या आजाराला आळा घालता येतो.
८) याव्यतिरिक्त या महामारीमध्ये अनेकांना आपल्या रोजगाराला मुकावे लागले आहे.
९) या आजारापासून बचाव करण्यासाठी जगभरामध्ये अनेक कोरोना प्रतिबंधक लसींचा यशस्वीरित्या वापर केला जात आहे.
१०) झपाट्याने केल्या जाणाऱ्या लसीकरणामुळे सध्या या आजाराला आळा घालणे शक्य होत आहे.