मित्रांनो आपण शाळेतील किंवा महाविद्यालयातील विद्यार्थी आहात आणि Essay on tiger in Marathi शोधत आहात का ? आम्ही वाघांवर तीन वेगवेगळ्या प्रकारे निबंध लिहून दिला आहे तो तुम्हाला समजायला सोपे जाईल.
वाघावर मराठी भाषेत निबंध Essay on tiger in Marathi
वाघावर मराठी भाषेत निबंध 10 lines on tiger in Marathi ( १० ओळी )
१) वाघ हा जंगली प्राणी आहे तो घनदाट जंगलात ( Wild animal ) राहतो.
२) वाघ वेगाने धावणाऱ्या बरोबर पाण्यात पोहु सुद्धा शकतो.
३) वाघाला दोन कान, दोन डोळे, लांब शेपूट, चार पाय आणि मजबूत पंजे असतात. त्याच्या पायाच्या पंजाची नखे खूप टोकदार असतात. तो त्याचा वापर शिकार करण्यासाठी करतो.
४) तो रात्री शिकारीला जातो आणि दिवसा आराम करतो.
५) वाघ हा जंगलात, प्राणीसंग्रहालयात त्याचप्रमाणे सर्कस मध्ये दिसून येतो.
६) वाघे भारत आणि आफ्रिका या देशांमध्ये अधिक संख्येने आहेत.
७) वाघाच्या ओरडण्याचा आवाजाला गर्जना असे म्हणतात. वाघ हा त्याच्या भीतीदायक आणि मोठ्या गर्जनेमुळे जगभर प्रसिद्ध आहे.
८) वाघाच्या तोंडात तीस दात असतात त्यामधले वरच्या भागातील दोन व खालच्या भागातील दोन दात मोठे व टोकदार असतात. वाघ त्या दातांचा वापर शिकार करण्यासाठी करतो.
९) वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
१०) वाघ मांजरीच्या प्रजातींचा आहे ज्यांचे वजन सुमारे 300 किलो असते.
वाघावर मराठी भाषेत निबंध Essay on tiger in Marathi ( २०० शब्दांत )
वाघ हा मांसाहारी प्राणी आहे आणि तो जंगलात राहतो. वाघ हा लहान आणि मध्यम आकाराच्या प्राण्यांची शिकार करतो. बहुतांश वाघांचा रंग पिवळा असतो व त्यावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. काही भागातील वाघ हे सफेद रंगाचे असतात व त्यांच्याही शरीरावर काळे पट्टे असतात. वाघ हा घनदाट जंगलात राहतो आणि त्याला दोन डोळे, दोन कान, एक शेपूट आणि त्याच्या पायाचा पंजाला टोकदार नखे असतात जे तो शिकार करण्यासाठी वापरतो.
जगभर चार हजार वाघ राहत आहेत त्यातली जवळ-जवळ दोन हजार वाघ हे भारतात आहेत. या प्राण्यांमध्ये मादीला वाघीण असे म्हटले जाते. वाघीण आपल्या मुलांना जन्म देते त्याला छावा असे म्हटले जाते. जेव्हा छावा दोन वर्षांचा असतो तेव्हा तो आपले परिवार सोडून निघून जातो.
वाघांची शिकार त्यांच्या हाडांमुळे आणि कातडे यासाठी तसेच वाघनखांसाठी केली जाते त्यामुळे वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. वाघ हा भारताचा आणि बांगलादेश देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. प्राणिसंग्रहालयातील वाघ हे 17 ते 19 वर्षे जगतात तर जंगलातील वाघ हे 25 वर्षांपर्यंत जगतात. वाघ शिकारीच्या वेळेला खूप वेगाने धावतात. ते शिकार करताना प्राण्यांच्या पाठीचा कणा मोडतात आणि खाऊन टाकतात.
वाघ हा म्हैस, हरिण, मेंढी, बकरी यांसारख्या प्राण्यांची शिकार करून त्यावर आपले उदरनिर्वाह करतो. वाघ आणि दिवसभर आराम करतो व रात्रीच्या वेळेला प्राण्यांची शिकार करतो. वाघाला पाण्यात पोहता येत असल्यामुळे तो पाण्यात जाऊनही प्राण्यांची शिकार करतो.
वाघावर मराठी भाषेत निबंध Essay on tiger in Marathi ( ५०० शब्दांत )
भारताचा राष्ट्रीय प्राणी ( National animal of India ) म्हणून ओळख असणारा वाघ हा प्राणी साधारणतः जंगलात आढळून येतो.
वाघ नारंगी किंवा पिवळ्या रंगाचा असून त्याच्या शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. त्या काळ्या पट्ट्याचा त्याला शिकार करताना लपण्यासाठी उपयोग होतो. तो शरीराने धष्टपुष्ट असला तरी तो अत्यंत चपळ प्राणी आहे.
त्याचे पाय भक्कम असून पंजे मजबूत असतात व त्याच्या पंज्यानं असलेली मजबूत व टोकदार नखे तो प्राण्यांची शिकार करत असल्याची जाणीव करून देतात. त्याचा जबडा अत्यंत मजबूत असतो व त्याला चार सुळे म्हणजेच मोठे दात असतात ते इतर दातांपेक्षा मोठे असून त्या दातांचा तो शिकार करण्यासाठी उपयोग करतो.
दिसायला सुंदर असलेल्या या वाघोबाने डरकाळी फोडल्यावर मात्र त्याच्या संहारक वृत्तीची जाणीव होते. वाघ हा नरभक्षी असल्याने तो त्याच्या उदरनिर्वाहासाठी ताजे मांस व रक्त यावर अवलंबून असतो.
साधारणतः रात्री प्राणी बेसावध असल्याने तो शिकार रात्रीत करतो. तो जंगलात प्रामुख्याने हरीण, झेब्रा इत्यादी प्राण्यांची शिकार करतो. त्यामुळे तो दिवसा आपल्या गुहेत पडून असतो व रात्री शिकार करतो. शिकार करण्याआधी तो एका ठिकाणी तग धरून लपून बसतो व भक्ष्य जवळ येण्याची वाट पाहतो एकदा भक्ष्य जवळ आले की तो त्यावर झडप घालतो व त्याचा वेगाने पाठलाग करतो.
शिकार करताना तो प्राण्याच्या मानेचा चावा घेतो व त्याची तडफड थांबेपर्यंत तो ती मान सोडत नाही.
सध्या जंगल तोडीमुळे जंगलातील प्राण्यांची संख्या कमी झाली आहे म्हणून तो आता गावाजवळ येऊन गाई, म्हशी तसेच बकऱ्या यांची शिकार करु लागला आहे यामुळे मानवी वस्तीला देखील धोका निर्माण झाला आहे.
वाघ हा अंदाजे चाळीस किलो एवढे मांस एकावेळी मस्त करतो त्यामुळे कधी शिकार मोठी असेल तर तो ते भक्ष्य आपल्या गुहेत आणून ठेवतो व काही दिवस त्यावर आपले गुजराण करतो.
तो शक्यतो एकट्याने राहणारा व एकटाच शिकार करणारा प्राणी आहे. पण तो त्याच्या बछड्याची तितकीच काळजी घेतो. शिकार केल्यानंतर नर वाघ पहिले वाघिणीला व बछड्यांना खाऊ देतो व नंतर स्वतः खातो.
वाघाचे आयुष्य हे जंगलात असल्यावर साधारणतः पंचवीस वर्ष इतके असते व जर तो प्राणिसंग्रहालयात राहत असेल तर त्याचे आयुष्य पंधरा वर्ष इतके असते आणि महत्त्वाची बाब म्हणजे जन्माला आल्यानंतर तो आठवडाभर पाहू शकत नाही.
सध्या वाघांची संख्या कमी होत चाललेली आहे, ही जागतिक पातळीवरील गंभीर बाब ठरली आहे. त्यामुळे वाघांची प्रमाण पृथ्वीवरून नष्ट होते की काय? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
WWF या संस्थेच्या 2020 च्या सर्वेक्षणानुसार जगात एकूण 3900 इतकेच वाघ राहिले आहेत आणि त्यातील 2/3 एवढे वाघ भारतात शिल्लक आहेत. पूर्वी राजे-महाराजे छंद म्हणून आणि साहसी वृत्ती दाखवण्यासाठी वाघाची शिकार करीत असत पण सध्याच्या विज्ञान युगात वाघाच्या अवयवांची तस्करी जागतिक स्तरावर चालली आहे व त्यातून प्रचंड पैशाची उलाढाल चालली आहे यामुळे काही लोक अवयव मिळवण्यासाठी वाघांची क्रूरपणे हत्या करीत आहेत यामुळे वाघांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होत चालली आहे. गेल्या दहा वर्षात जवळजवळ 1000 वाघांची हत्या केली गेली आहे.
वाघ हा फक्त जंगली प्राणी नसून तो जंगलातील जैविक साखळी चा महत्त्वाचा घटक आहे. तो जंगलातील अन्नसाखळीमध्ये सर्वोच्च भक्षकाचे काम करतो. त्यामुळे जर वाघांची अशीच हत्या होत राहिली आणि जर ही संख्या कमी झाली तर ही अन्नसाखळी कोलमडून जैवसृष्टीचा समतोल बिघडू शकतो. त्यामुळे जीवसृष्टीवरील ताण कमी करण्यासाठी व वाघांच्या संख्येत होणारी घट कमी करण्यासाठी भारत सरकार वेळोवेळी महत्वाची पावले उचलीत आहे. त्यांची प्रजाती नष्ट होण्यापासून बचाव करणे ही काळाची गरज आहे व आपले कर्तव्य आहे.
सन 2010 पासून, प्रत्येक वर्षी 29 जुलै हा दिवस जागतिक वाघ दिवस ( International tiger day ) म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे वाघांच्या कमी होणाऱ्या संख्येबाबत जनजागृती करणे. यासाठी तेरा देशांनी एकत्र येऊन सन 2022 पर्यंत वाघांची संख्या दुपटीने वाढवण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे वाघ ही एक नैसर्गिक संपत्ती आहे आणि तिचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.