विषुववृत्त म्हणजे काय? सर्व माहिती

Meaning of equator in Marathi मित्रहो आज आपण या लेखात विषुववृत्त म्हणजे काय व याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.

Meaning of equator in Marathi

विषुववृत्त म्हणजे काय? Meaning of equator in Marathi

विषुववृत्त म्हणजे काय?

पृथ्वीच्या मध्यावरुन जाणार्‍या व पृथ्वीला उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध अशा दोन भागांमध्ये विभागणाऱ्या काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात.

तसेच विषुववृत्ताला ०° अक्षवृत्त असेही म्हटले जाते. विषुववृत्त हे पृथ्वीला दक्षिण गोलार्ध व उत्तर गोलार्ध अशा दोन भागांमध्ये विभागते.

विषुववृत्त हे दक्षिण पूर्व व उत्तर ध्रुवापासून समान अंतरावर असते. विषुववृत्ताजवळ असणाऱ्या पृथ्वीचा परीघ हा ४००७५ किलोमीटर इतका लांब आहे तर विषुववृत्ताजवळील पृथ्वीचा व्यास हा १२७४२ किलोमीटर इतका लांब आहे.

विषुववृत्त कोणत्या खंडात मधून व देशांमधून गेले?

विषुववृत्त हे प्रामुख्याने आफ्रिका, दक्षिण अमेरिका, व आशिया या खंडात मधून गेले आहे. तसेच विषुववृत्त गेलेल्या देशांची नावे ही खंडानुसार पुढीलप्रमाणे विभागली आहेत.

आफ्रिका खंड: गॅबॉन, कॉंगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो, युगांडा, केनिया, सोमालिया,साऊँ टोमे अ‍ॅन्ड प्रीन्सिपे

दक्षिण अमेरिका खंड: इक्वाडोर, कोलंबिया, ब्राझील

आशिया खंड: इंडोनेशिया, मालदीव, किरीबाती

म्हणजेच विषुववृत्त हा तीन खंडांत मधून तसेच 13 देशांमधून गेला आहे.

विषुववृत्त कोणत्या महासागरातून जाते?

विषुववृत्त हे पुढील तीन महासागरातून गेले आहे,

अ) पॅसिफिक महासागर
ब) अटलांटिक महासागर
क) हिंदी महासागर

अवकाश यान विषुववृत्ताजवळुन का सोडले जातात?

विषुववृत्त हा पृथ्वीचा अक्षापासून सर्वाधिक लांब असल्यामुळे विषुववृत्ताजवळ पृथ्वी सर्वाधिक वेगाने म्हणजेच ११८० किलोमीटर प्रतितास वेगाने फिरते.

त्यामुळे या ठिकाणाहून अवकाश यान प्रक्षेपित केल्यास अवकाशयानाला मिळणारी केंद्रापसारक शक्ती (centrifugal force) अवकाशयानाचा वेग वाढवण्यास मदत करते.

यामुळे अवकाश यान प्रक्षेपित करण्यासाठी कमी इंधनाचा वापर होतो. म्हणूनच अवकाशयान विषुववृत्ताजवळुन सोडले जाते

विषुववृत्त संदर्भातील काही आश्चचर्यकारक तथ्य:

विश्ववृत्त संदर्भातील काही आश्चर्यकारक गोष्टी पुढील प्रमाणे आहेत.

१) विषुववृत्ताजवळ सर्वात जलद सूर्योदय व सूर्यास्त होतो.
२) विषुववृत्ताजवळ बारा तास दिवस व बारा तासांची रात्र असते पण इतर ठिकाणी हे अनुभवण्यास मिळत नाही.
३) विषुववृत्ताजवळ गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात कमी असते त्यामुळे कोणत्याही वस्तूचे वजन विषुववृत्तावर सर्वात कमी दाखवते.
४) विषुववृत्तावर तापमान अधिक असूनही कायांबे हे विषुववृत्तावरील एकमेव ठिकाण आहे जेथे हिमवृष्टी होते.

हे देखील वाचा:-

Share on:

Leave a Comment