PSI (Police sub inspector) परीक्षेची संपूर्ण माहिती

PSI exam information in Marathi मित्रहो आज आपण या लेखात PSI परीक्षेसंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.

PSI exam information in Marathi

पीएसआय परीक्षेची माहिती | PSI exam information in Marathi

पीएसआय परीक्षा काय असते? PSI meaning in Marathi

महाराष्ट्र पोलीस दलातील पीएसआय म्हणजेच उपनिरीक्षक पदासाठी (Police sub inspector) होणारी निवड परीक्षा ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेतली जाते.

ही निवड प्रक्रिया पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखत अशा एकूण चार टप्प्यांमध्ये घेतली जाते.

यापुढील लेखामध्ये पीएसआय परीक्षेसाठी असावी लागणाऱ्या पात्रतेच्या अटी निवड प्रक्रिया, शारीरिक चाचणी इत्यादीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पीएसआय भरतीसाठीची पात्रता PSI eligibility in maharashtra:

अ) शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावा.
ब) उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान अवगत असणे आवश्यक आहे.
क) पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येतो‌ पण पूर्वपरीक्षा होण्याअगोदर पदवी अभ्यासक्रम पूर्ण व्हावा लागतो.
ड) पीएसआय निवड प्रक्रियेसाठी कामाचा अनुभव असणे गरजेचे नसते.

पीएसआय भरतीसाठीची वयोमर्यादा PSI age limit in maharashtra:

पीएसआय भरतीसाठी असावी लागणारी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे:-

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे कमीत कमी वय 19 वर्ष व जास्तीत जास्त वय 31 वर्ष इतके असावे लागते. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांचे कमीत कमी वय 19 वर्षे तर जास्तीत जास्त वय 34 वर्षे इतके असावे लागते.

पीएसआय भरती प्रक्रिया PSI selection process in maharashtra in marathi:

पीएसआय भरतीसाठी असणारी निवड प्रक्रिया ही चार टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा देता येते.

या भरतीसाठी असणारे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत:-

१) पूर्व परीक्षा: ही परीक्षा एकूण शंभर गुणांची असते तसेच यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
२) मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षेमध्ये प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतात. यामध्ये विचारले जाणारे प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. तसेच दोन्ही पेपरसाठी प्रत्येकी एक तासाचा अवधी मिळतो.
३) शारीरिक चाचणी: शारीरिक चाचणी ही शंभर गुणांची असते.
४) मुलाखत: ४०‌ गुण

पीएसआय परीक्षेचे स्वरूप Mpsc PSI exam pattern in marathi:

पीएसआय पदासाठी पूर्व व मुख्य अशा दोन लेखी परीक्षा घेतल्या जातात.

पीएसआय पूर्व परीक्षा:-

१) पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते.
२) यामध्ये general awareness या विषयावर शंभर प्रश्न विचारले जातात.
३) या परीक्षेसाठी एक तासाचा अवधी मिळतो.
४) यामधील प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाचे असतात.
५) प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असतो.

पीएसआय मुख्य परीक्षा:

मुख्य परीक्षेसाठी शंभर मार्गाचे दोन पेपर असतात. प्रत्येक पेपरसाठी एक तासाचा अवधी मिळतो.

१) पेपर १:
पेपर 1 मध्ये साठी पुढील विषयांचा समावेश केला जातो
अ) मराठी: मराठी विषयावर 50 गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जातात.
आ) इंग्रजी: इंग्रजी विषयावर 30 गुणांसाठी तीस प्रश्न विचारले जातात
इ) सामान्य ज्ञान: यामध्ये 20 गुणांसाठी 20 प्रश्न असतात.

२) पेपर 2:
सामान्य ज्ञान, ॲप्टीट्युड, मानसिक क्षमता ह्या विषयांवर शंभर गुणांसाठी शंभर प्रश्न विचारले जातात.

शारीरिक पात्रता PSI physical criteria in marathi:

पीएसआय पदासाठी लागणारी शारीरिक पात्रता ही महिला व पुरुषांसाठी वेगळी असते.

पुरुष:
१) कमीत कमी उंची 165 सेंटिमीटर
२) छाती न फुगवता ७९ सेमी
३) छाती फुगण्याची क्षमता ५ सेमी

महिला:
कमीतकमी उंची 157 सेमी इतकी असावी लागते

शारीरिक चाचणी Maharashtra psi physical test details:

शारीरिक चाचणीमध्ये पुरुष व महिलांसाठी वेगळा आराखडा असतो. ही शारीरिक चाचणी ही शंभर गुणांची असते.

पुरुषांकरिता:
१) गोळा फेक: १५ गुण
२) पुलअप्स गुण: २० गुण
३) लांब उडी गुण: १५ गुण
४) धावणे (८०० मीटर): ५० गुण

महिलांकरिता:

१) गोळा फेक : २० गुण
२) धावणे (४०० मीटर): ५० गुण
३) लांब उडी: ३० गुण

अशाप्रकारे आम्ही PSI exam information in Marathi या लेखात पीएसआय या पदासाठी होणाऱ्या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Share on:

1 thought on “PSI (Police sub inspector) परीक्षेची संपूर्ण माहिती”

Leave a Comment