[मराठी] Bharat swachata abhiyan essay in Marathi | Swachh bharat abhiyan essay in Marathi

Bharat swachata abhiyan essay in marathi मित्रांनो उत्तम आरोग्याकडे जाणारा मार्ग म्हणजे स्वच्छता. मनाच्या व शरीराच्या उत्तम आरोग्याची सुरुवात ही स्वच्छतेपासून होते. स्वतःबरोबरच आपले घर, आपला परिसर, आपला गाव व पर्यायाने आपला देश स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. याच कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी भारतामध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली.

आम्ही या लेखात swachh bharat mission in marathi या विषयाबद्दल सविस्तर स्वरूपात माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे‌. दिलेली माहिती आम्ही मुद्देसूद रित्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो तुम्हाला नक्की आवडेल अशी आम्ही आशा करतो.

Bharat swachata abhiyan essay in marathi
bharat-swachata-abhiyan-essay-in-marathi

Swachh Bharat abhiyan essay in Marathi | Bharat swachata abhiyan essay in Marathi

स्वच्छ भारत अभियान ( Swachh Bharat Mission ) ही भारताच्या इतिहासातील स्वच्छतेसंदर्भात उभी राहिलेली एक महत्त्वाची

मोहीम आहे. या अभियानांतर्गत स्वच्छतेसंदर्भात मुलभूत असणाऱ्या सोयी जसे की शौचगृह बांधणे, द्रव कचरा व घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे, गाव स्वच्छता व प्रत्येक व्यक्तीपर्यंत स्वच्छ पिण्यायोग्य व मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देणे या बाबींची पूर्तता करण्याचा संकल्प केला गेला.

स्वच्छ भारत महात्मा गांधींचे स्वप्न :-

स्वच्छता हा महात्मा गांधींचा अट्टाहास होता व स्वच्छ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांच्यामते ईश्वराजवळ पोहोचण्याचे पहिले पाऊल म्हणजे स्वच्छता हे होय.

गांधीजींचे हे स्वप्न साकार करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra modi ) यांनी दोन ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियान या मोहिमेला सुरुवात केली.

माननीय पंतप्रधान यांच्यामध्ये गांधीजींच्या ( Mahatma Gandhi ) दीडशेव्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान पूर्णत्वास नेणे हीच त्यांना दिलेली खरी मानवंदना ठरेल.

स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात :-

2 ऑक्टोबर 2014 पासून संपूर्ण भारतवर्षामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली व व त्यानंतर या अभियानाने राष्ट्रीय चळवळीचे स्वरूप घेतले.

या मोहिमेचा मुख्य हेतू म्हणजे 02 ऑक्टोबर 2019 पर्यंत म्हणजेच गांधीजींच्या 150 व्या जयंती पर्यंत स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करणे हे आहे.

या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती घडवून आणणे व त्यासाठी स्वच्छ व सुसज्ज शौचालय व स्वच्छतागृहांची उभारणी करणे तसेच उघड्यावर शौच करण्यास प्रतिबंध करणे. ही योजना पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या ( Ministry of Drinking Water and Sanitation ) अंतर्गत राबवली जात आहे.

2019 पर्यंत स्वच्छतागृहांची संख्या तीन पटीने वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे तसेच देशाला उघड्यावर केल्या जाणाऱ्या शौचापासून मुक्त करणे हा यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच शौचालय बांधणीचा दर 2019 पर्यंत तीन टक्‍क्‍यांपासून ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढवणे व केंद्र व राज्य पातळीवर जनजागृती करणारी माध्यमे स्थापन करणे व शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वच्छतेबाबत प्रत्येक चौकाचौकात जनजागृती करणे. अस्वच्छ शौचालयाचे स्वच्छ व फ्लश सुविधा असलेल्या शौचालय मध्ये रूपांतर करणे. हे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले.

तसेच या अभियानामध्ये लोकांमध्ये उघड्यावर शौच करण्याचे धोके तसेच घनकचऱ्याचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम (Environmental Pollution ) याबाबत माहिती देण्यावर भर देण्यात येत आहे.

भारताला हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेच्या सुरुवातीला देशातील 4041 शहरांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला.

भारत स्वच्छता अभियानाची उद्दिष्टे Swachh bharat abhiyan main points :-

  • भारताला हागणदारीमुक्त बनवणे
  • त्यासाठी खासगी, सामूहिक व सार्वजनिक शौचालय उभारणे
  • गावपातळीवर शौचालय वापरासंदर्भातील वाढ घडून आणण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे.
  • गाव स्वच्छ ठेवणे व कचऱ्याचे व्यवस्थापन करणे.
  • उघड्यावरील शौच करण्याचे धोके पटवून देणे.
  • गावांमध्ये पाण्याच्या पाइपलाइनची सोय करून घराघरात पाणी पोहोचवणे.
  • ग्रामपंचायत पातळीवर ओल्या व सुक्‍या कचऱ्याचे व्यवस्थापन करून त्यांची विल्हेवाट लावणे.
  • 15 ऑगस्ट 2015 पर्यंत सर्व शाळांमध्ये मुली व मुलांसाठी वेगवेगळे शौचालय उभारणे.
  • अंगणवाड्यांमध्ये शौचालयाची सुविधा पुरवणे.

या योजनेचे एकूण दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले पहिला टप्पा हा 2 ऑक्टोबर 2014 पासून 2 ऑक्टोबर 2019 पर्यंतचा आहे व दुसरा टप्पा हा दोन ऑक्टोबर 2019 पासून दोन ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.

तसेच ग्रामीण व शहरी भागात अशा वेगळ्या स्तरावर हा उपक्रम राबवण्यात आला.

१. स्वच्छ भारत अभियान (शहरी विभाग) Swachh bharat mission (Urban) :-

Bharat swachata abhiyan essay in marathi
bharat-swachata-abhiyan-essay-in-marathi

या योजनेतील स्वच्छ भारत अभियान ही मोहीम शहरी विकास मंत्रालय अंतर्गत राबवली जाते आहे. यांच्या कार्यप्रणाली मध्ये शहरी भागात स्वच्छतागृहे व घरगुती शौचालय उपलब्ध करून देणे या बाबींचा समावेश केला गेला.

या मोहिमेअंतर्गत विविध शहरांत जिथे शक्य असेल तिथे घरगुती शौचालय व शक्य नसेल तर सामुहिक शौचालय तसेच बस स्टँड बाजारपेठ रेल्वे स्टेशन या ठिकाणी सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृह उभे करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला.

हा उपक्रम देशातील एकूण 4041 शहरांमध्ये राबवण्यात आला.तसेच या योजनेतील मंजूर रकमेचा काही भाग आहे शहरांतील द्रव व घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आला. तसेच लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीसाठी राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांवर भर देण्यात आला.

तसेच या योजनेमधून उघड्यावर शौचास बंदी घालण्यात आली. अस्वच्छ शौचालयाचे रूपांतर स्वच्छ व फ्लश सुविधा उपलब्ध असलेल्या शौचालयांमध्ये करण्यात आले. शहरी घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले व लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वच्छतेचे व उत्तम आरोग्याचे महत्व पटवून देण्यात आले.

यामध्ये एक कोटी इतकी घरगुती तसेच दोन लाखा इतके सामुहिक शौचालय व 2.6 लाख इतके सार्वजनिक शौचालयाची पूर्तता करण्याचा संकल्प आहे.

तसेच प्रत्येक शहरामध्ये घनकचऱ्याचे योग्यरीत्या व्यवस्थापन ( Solid waste management ) करणारी कार्यप्रणाली कार्यान्वित करण्याचा निश्चय केला आहे.

२. स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण विभाग) Swachh bharat mission (gramin) :-

Bharat swachata abhiyan essay in marathi
bharat-swachata-abhiyan-essay-in-marathi

या योजनेचाही मूळ उद्देश हा 2019 पर्यंत भारताला हागणदारी मुक्त करणे व त्यासाठी ग्रामीण भागांमध्ये 11 कोटी 11 लाख इतक्या शौचालयाची बांधणी करणे हा होता.

तसेच मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गावांमधील घनकचऱ्याचे विघटन करून त्याचे रूपांतर जैविक खतांमध्ये तसेच इतर ऊर्जास्रोतांमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात झाली.

गावांमधील या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ( Zilla Parishad ) यांचा समावेश करून या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले गेले.

गावांमधल्या शौचालय बांधण्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीची रक्कम दहा हजारांवर 12 हजारांपर्यंत वाढविण्यात आली या मागचा उद्देश म्हणजे उत्तम शौचालय बरोबर पाण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देणे हा होता.

स्वच्छ भारत अभियानाचे परिणाम Swachh Bharat Mission effects :-

  • स्वच्छता व आरोग्य यामधील संबंध पटवून देण्यात या मोहिमेचा मोठा हातभार होता.
  • स्वच्छतेकडून आरोग्याकडे नेण्याच्या या योजनेमध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्तींनी हातभार लावला.
  • स्वच्छ भारत अभियान ( Swachh Bharat Mission ) सुरू झाल्यानंतर अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचा दर 13 टक्‍क्‍यांवरून नऊ टक्क्यांपर्यंत कमी झाला.
  • अस्वच्छ पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गातून जाणाऱ्या बळींची संख्या 13 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली.
  • छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यात 80 टक्‍क्‍यांहून अधिक प्रमाणात योजना सफल झाली आहे.

Read also:-

Share on:

Leave a Comment