बी एस सी म्हणजे काय? संपूर्ण माहिती

Bsc information in Marathi मित्रानो आज आपण या लेखात बी एस सी म्हणजे काय? हे पाहणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या.

BSc information in Marathi

बी एस सी म्हणजे काय ? BSc information in Marathi

बी एस सी म्हणजे काय?

Bsc या संज्ञेचा full form Bachelor of science असा होतो म्हणजेच विज्ञान शाखेमध्ये पदवीधर. बीएससी म्हणजे तीन वर्षासाठी असलेला विज्ञान शाखेमधील पदवीधर कोर्स आहे. हा कोर्स विज्ञान शाखेमध्ये बारावी पूर्ण झाल्यानंतर केला जातो. या कोर्समधून अनेक विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते तसेच यामध्ये नॉर्मल बीएससी चा देखील पर्याय उपलब्ध आहे.

बहुतेकदा इंजीनियरींग किंवा मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते परंतु बीएससी साठी होणारे प्रवेश हे बारावीच्या गुणांवर अवलंबून असतात. व क्वचित काही विद्यापीठांमध्येच प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

इतर कोर्सेस प्रमाणेच बीएससी करण्यास देखील विद्यार्थी मोठ्या संख्येने पसंती दर्शवतात.

बीएससी मध्ये प्रवेश मिळण्यासाठीची पात्रता:

बीएससी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हवी असणारी पात्रता पुढील प्रमाणे आहे.

१) बारावी मध्ये विज्ञान शाखेतून कमीत कमी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण (टक्केवारीची मर्यादा प्रत्येक विद्यापीठासाठी वेगळी असते)
२) बारावी मध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र असे आवश्यक असणारे मुख्य विषय घेतलेले असावे.
३) काही विद्यापीठांसाठी त्यांनी ठरवून दिलेल्या प्रवेश परीक्षा देणे गरजेचे असते.

प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारा पात्रतेचा आराखडा हा प्रत्येक कॉलेज व विद्यापीठानुसार वेगळा असतो.

बीएससी प्रवेश प्रक्रिया:

बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाल्यानंतर बीएससी अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी पुढील पैकी कोणत्याही एका प्रक्रियेचा अवलंब केला जातो.

१) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (Centralised admission process):

काही राज्यांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो.यामध्ये विद्यार्थ्याला विद्यापीठानं दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो.

यासोबतच आपण इच्छुक असलेल्या महाविद्यालयाची नावे द्यावी लागतात. यानंतर जर मेरिटनुसार आपण इच्छुक असलेल्या महाविद्यालयांमध्ये सीट अलॉट झाली तर पुढील प्रक्रियेसाठी त्या महाविद्यालयाशी संपर्क करावा लागतो.

जर इच्छुक महाविद्यालयामध्ये सीट आलोट झाली नाही तर दुसऱ्या फेरीसाठी पुन्हा महाविद्यालय ची नावे द्यावी लागतात.

२) प्रवेश परीक्षा (Entrance exam):

काही विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी ठरवून दिलेली प्रवेश परीक्षा द्यावी लागते
यानंतर विद्यापीठ मेरीट लिस्ट जाहीर करते.

यानंतर काउंसलिंग द्वारा विद्यार्थी इच्छुक असणाऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जातो,

३) डायरेक्ट ऍडमिशन:

काही महाविद्यालय व मान्यताप्राप्त विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून थेट अर्ज स्वीकारतात तसेच काही ठिकाणी महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा लागतो. यासाठी बारावी मध्ये मिळालेल्या गुणांचा वापर करून मेरीट लिस्ट तयार केली जाते व यानंतर पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.

बी एस सी अंतर्गत येणारे विविध कोर्सेस:

बीएससी हा कोर्स विषयानुसार विविध उपप्रकारांमध्ये विभागला जातो. या मध्ये येणारे काही प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.

१) नॉर्मल बीएससी
२) बीएस्सी फिजिक्स
३) बीएस्सी केमिस्ट्री
४) बीएस्सी मॅथेमॅटिक्स
५) बीएस्सी बॉटनी
६) बीएससी आय टी
७) बीएस्सी कम्प्युटर सायन्स
८) बीएससी झूलॉजी
९) बीएससी बायोटेक्नॉलॉजी
१०) बीएससी क्लिनिकल रिसर्च अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट
११) बीएससी मायक्रोबायोलॉजी
१२) बीएससी एग्रीकल्चर
१३) बीएससी नर्सिंग
१४) बीएससी रेडिओलॉजी
१५) बीएससी फॉरेस्ट्री
१६) बीएससी फिजिओथेरपी
१७) बीएससी बायोइन्फर्मेटिक्स

याव्यतिरिक्त इतरही विविध कोर्सेसचा समावेश बीएससी मध्ये केला जातो.

बीएससी नंतर शैक्षणिक संधी:

बीएससी पूर्ण झाल्यानंतर अनेक शैक्षणिक संधी उपलब्ध असतात यातील काही कोर्स संदर्भात माहिती पुढे दिली आहे.

१) एम.एस.सी.: बीएस्सी नंतर एम.एस.सी. हा दोन वर्षाच्या मास्टर कोर्स असतो.
२) बी. इ./ बी. टेक.: बीएससी नंतर इंजीनियरिंग मधील तीन वर्षाचा बी. इ./ बी. टेक. कोर्स पूर्ण करून इंजिनिअर होता येते.
३) एम सी ए (master in computer application)
४) एमबीए:
५) डेटा सायन्स एक्सपर्ट
६) बी.एड.: बीएस्सी नंतर शिक्षक होण्यासाठी दोन वर्षासाठी बी.एड. पूर्ण करावा लागतो. तसेच बी.एड साठी ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

याव्यतिरिक्त बीएस्सी नंतर अनेक करिअरच्या संधी उपलब्ध असतात.

तर अशाप्रकारे आम्ही बी एस सी म्हणजे काय याबद्दल सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

Share on:

Leave a Comment