मित्रहो मागच्या लेखात आपण डिप्लोमा कोर्से बद्दल संपूर्ण माहिती पहिली, आज आपण या लेखात पदवी म्हणजे काय आणि त्याविषयीची भरपूर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला तर मग जाणून घेऊया या.
पदवी म्हणजे काय? | Degree information in Marathi
पदवी म्हणजे काय? Degree meaning in Marathi
पदवी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रातील पात्रता किंवा स्तर आहे. पदवी ही विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये किती पारंगत आहे व त्याचा त्या विषयासंबंधी चा अभ्यास किती खोलवर आहे हे दर्शवते.
पदवी ह्या एखाद्या जिन्याच्या पायऱ्यांप्रमाणे असतात म्हणजे पुढच्या पायरीवर जाण्यासाठी त्याच्या अगोदर पायरी सर करणे गरजेचे असते.
त्याचप्रमाणे पदवीधर, पदव्युत्तर, पीएचडी यासुद्धा चढत्या क्रमाने पूर्ण कराव्या लागतात. म्हणजेच जर तुम्हाला एखाद्या विषयांमध्ये पीएचडी पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला पदवीधर व पदव्युत्तर पूर्ण करणे गरजेचे असते.
पदवीचे साधारण प्रकार:
पदवी मध्ये येणारे साधारण प्रकार हे चढत्या क्रमाने पुढीलप्रमाणे नमूद केले आहे.
असोसिएट पदवी:
असोसिएट पदवी ही उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे बारावी पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षासाठी असते.
ही पदवी त्यांच्याकरिता तयार केली आहे ज्यांना एखादी बॅचलर डिग्री कमी वर्षात पूर्ण करायची असते.
ही पदवी सेमिस्टर वर आधारित असते तसेच यासाठी भरावी लागणारे शुल्क हे बॅचलर डिग्रीपेक्षा कमी असते.
यामध्ये विद्यार्थ्यांना कमी वेळात आवश्यक असणारे कौशल्य/ माहिती दिली जाते.
असोसिएट पदवीचे पुढीलप्रमाणे चार प्रकार पडतात:
१) A.A.: असोसिएट ऑफ आर्ट्स
२) A.S.: असोसिएट ऑफ सायन्स
३) A.A.A.: असोसिएट ऑफ अप्लाइड आर्ट्स
४) A.A.S.: असोसिएट ऑफ अप्लाइड सायन्स
बॅचलर पदवी:
बॅचलर पदवी हा उच्च माध्यमिक स्तर पूर्ण केल्यानंतर तीन ते पाच वर्षांचा अभ्यासक्रम असतो. ही पदवी विज्ञान, वाणिज्य, कला, तंत्रज्ञान, वैद्यकीय, औषध निर्माण इत्यादी शाखांमध्ये दिली जाते.
या पदवीसाठी बारावी किंवा असोसिएट पदवी पूर्ण असणे गरजेचे असते.
पदव्युत्तर पदवी (Master’s degree):
पदविका पूर्ण झाल्यानंतर एखाद्या विषयांमध्ये खोलवर व विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी पदव्युत्तर पदवी घेतली जाते.
या पदवीचा अभ्यासक्रम हा साधारण दोन वर्षांसाठी असतो. पदव्युत्तर पदवी ही साधारणत: पदविका परीक्षेमध्ये असणाऱ्या विषयानुसार विभागली जाते.
पीएचडी (डॉक्टर ऑफ फिलॉसोफी):
पीएचडी ही एक उच्चस्तरीय पदवी असून याचा उपयोग एखाद्या विषयामध्ये विशेष प्रावीण्य मिळवण्यासाठी केला जातो.
पीएचडी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेला असणे गरजेचे असते.
पीएचडी साठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक मार्गदर्शक म्हणजेच गाईड दिला जातो व त्याच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना एखाद्या रिसर्चसाठी काम करावे लागते.
पदवी व त्यासाठी लागणारी पात्रता:
१ | असोसिएट | उच्च माध्यमिक उत्तीर्ण |
२ | पदवीधर (achelors) | असोसिएट /उच्च माध्यमिक |
३ | पदव्युत्तर (मास्टर्स) | पदवीधर (bachelors) उत्तीर्ण |
४ | पीएचडी | पदव्युत्तर (मास्टर्स) उत्तीर्ण |
मित्रहो अशाप्रकारे आम्ही Degree information in Marathi या लेखात पदवी म्हणजे काय या बाबतीत सर्व माहिती दिली आहे.
हे देखील वाचा: