मित्रांनो तुम्ही Essay on My mother in Marathi या विषयावर माहिती शोधत आहात का ? आम्ही या लेखात अत्यंत सोप्या भाषेत हा निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक भाषेत आईसाठी वेगवेगळी संबोधने असली तरीही त्यात असलेली भावना व गोडवा तसाच असतो. आई आपल्यावर किती प्रेम करते हे शब्दात मांडणे नेहमीच कठीण. अशा या आईबद्दल आम्ही निबंध लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
Essay on My mother in Marathi for class 1, 3, 5, 6, 10
अशा या सुंदर शब्दात कवीने आपल्या आईच्या उदात्त प्रेमाचे वर्णन केले आहे. अगदी संतांपासून ते आतापर्यंत अनेकांनी आईची थोरवी पटवून देणारी काव्य रचली.
आई ही फक्त व्यक्ती नसून ती एक भावना आहे, जी फक्त माणसातच नाही तर सृष्टीतील प्रत्येक सजीवांमध्ये तिच्या बाळाला जन्म दिल्यावर निर्माण होते. माझी आई सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या दिवसाची सुरुवात ही माझ्या आईच्या सुंदर स्मितहास्याने होते. माझ्यासाठी माझी आई हे प्रेम आणि काळजीचे जगातील सर्वात सुंदर उदाहरण आहे.
अगदी लहानपणापासूनच ती आमची फार काळजी घेते. ती स्वभावाने अत्यंत प्रेमळ व शिस्तप्रिय आहे. दुसऱ्यांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारी माझी आई परमेश्वराचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
आजपर्यंत तिने मला अत्यंत कष्टाने व प्रेमाने वाढवले. तिने आम्हाला चांगल्या व वाईट गोष्टींची पारख करायला शिकवले. जेव्हा मला बोलताही येत नव्हते तेव्हा पासूनच तिला माझ्या मनातलं कळतं. तिच्यामुळेच आमच्या घराला घरपण येतं. ती आमच्या साठी सतत कष्ट करीत असते. ती सकाळी सर्वांच्या आधी उठते व सर्वजण झोपी गेल्यावर झोपते.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती आमच्यासाठी सतत झटत असते. आमच्या आवडीनिवडी जपत असते आमच्या भविष्याची सतत काळजी करते पण स्वतः मात्र परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते. आमच्या पुढे स्वतःच्या आवडीनिवडीचा कधीही विचार करत नाही. मला नैतिकदृष्ट्या घडवण्यात तिचा मोलाचा वाटा आहे.
आम्हा भावंडांपैकी जर कोणी आजारी पडलो तर मात्र ती रात्रंदिवस आमची काळजी घेते. जोपर्यंत आम्हाला बरे वाटत नाही तोपर्यंत तिला झोपच लागत नाही. तिची तब्येत बरी नसली तरीही ती आमचे करण्यात कुठेच कमी पडत नाही.
ती घरातील महत्त्वाचे निर्णय खंबीरपणे घेते आई हा शब्दच प्रेम, ममता व वात्सल्याने भरला आहे. या गोड शब्दाचे महत्व ज्यांना आई नसते अशा मुलांना जास्त कळत असेल.
अशा स्वतःपेक्षा आपल्यावर जास्त प्रेम करणाऱ्या आई-वडिलांचे आजकालच्या मुलांना ओझे वाटते. त्यांना हे कळत नाही की जशी लहानपणी आपल्याला त्यांची गरज असते तसेच त्यांच्या म्हातारपणात त्यांना देखील आपल्या आधाराची गरज असते.
माझी आई ही माझ्यासाठी कायमच आदर्श आहे. तिच्यातील कष्टाळूपणा, समर्पण, निस्वार्थी प्रेम करणे हे गुण आत्मसात करणे खरेच कठीण आहे.
माझ्या अभ्यासाबाबतीतही ती अत्यंत शिस्तप्रिय आहे. तिला तिचे शिक्षण पूर्ण करता आले नाही पण आम्ही आमचे शिक्षण व्यवस्थित पूर्ण करावे हा तिचा नेहमीच अट्टाहास असतो. आजवर आमच्या शिक्षणासाठी तीने अपार कष्ट घेतले व आजही घेतेच आहे. ती आम्हाला प्रत्येक वेळी प्रोत्साहित करीत असते.
तसेच ती लहानपणापासूनच आम्हाला आमच्या अभ्यासात मदत करते व आमच्या अडचणी सोडवते. ती जरी सामान्य स्त्री असली तरीही माझी आई माझ्यासाठी असामान्य आहे. तिच्या फक्त सोबत असण्याने प्रोत्साहन मिळते. आई म्हणजे देवाने दिलेली भेट नाही तर आई म्हणजे आपल्या भेटीला आलेला प्रत्यक्ष देवच आहे. आई म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट आहे.
आई ही नेहमीच तिच्या कुवतीपेक्षा जास्त सुख देण्याचा प्रयत्न करत असते. बाबांना व आम्हाला आठवडाभर काम केल्यानंतर रविवारी हक्काची सुट्टी असते पण या दिवशी तर आईला दुप्पट काम करावे लागते. तीला तर कधीच सुट्टी मिळत नाही. आमचे वेगवेगळे हट्ट पूर्ण करण्यात तिचा रविवार निघून जातो.
आई जर एखादा दिवस आजारी पडली तर तिच्या बरोबरच संपूर्ण घर देखील आजारी पडते. सतत धावपळ करणाऱ्या आईची तब्येत बिघडली की बेचैन व्हायला होतं तेव्हा मात्र बाबा व आम्ही भावंडे तिची काळजी घेतो. घरातील सर्व कामे करण्याचा प्रयत्न करतो. पण खरंतर त्यावेळी तिच्या कष्टांची जाणीव होते कारण आम्ही तिघे मिळून जे काम वेळेत करू शकत नव्हतो ते काम ती एकटीच दररोज व न थकता करते.
एखाद्याने जग जरी जिंकून घेतले पण जर त्याच्याकडे शाबासकीची थाप द्यायला आईच नसेल तर मात्र त्यांनी कमावलेले यश हे नगण्य आहे. हीच बाब पटवून देताना कवी यशवंत म्हणतात की,
त्यामुळे जर मी भविष्यात कुठेही असेन पण माझ्या आईची साथ मी आयुष्यभर सोडणार नाही.
तर मित्रहो अशा रीतीने या Essay on My mother in Marathi for class 1, 3, 5, 6, 10 लेखात Essay on My mother in Marathi लिहण्याचा प्रयत्न केला आहे. आवडल असेल तर मित्रांबरोबर नक्कीच हा लेख शेअर करा.