If I were a fish essay in Marathi मित्रहो आज तुमच्यासाठी अजून एक कल्पनात्मक निबंध घेऊन आलो आहोत. या निबंधात मी मासा असतो तर याबद्दलचे माझे विचार मांडले आहेत. मला खात्री आहे कि हा लेख तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरु करू या.
If I were a fish essay in Marathi जर मी मासा असतो तर
If I were a fish essay in Marathi (३०० शब्दांत)
मी अनेकदा शाळा सुटल्यानन्तर आमचा शाळेचा नजदिक असलेल्या तलावा कडे जातो. शांत तलावा शेजारी बराच वेळ बसतो, तलावातील शांतपणे पोहोत असलेले मासे बघत राहतो. त्यांचा कडे पाहून असं वाटले अरे किती मस्त आहे यांचे जीवन, किती छान पोहत आहेत हे, किती आनंद घेत आहेत आणि एकदा असेच मनात आले मी मासा असतो तर….
मी मासा असतो तर पाण्यामध्ये खूप पोहलो असतो. तलावामधील एकुन एक भागात फिरलो असतो. तलावातील विविध प्रकारचा वनस्पती बघितल्या असत्या.
माझा सोबत असणाऱ्या बाकी इतर माशांना भेटलो असतो, त्यांच्या सोबत पाण्यामध्ये खूप खेळलो असतो. तलावातील विविध इतर संजीवाना देखील भेटलो असतो. देवाने निर्माण केलेल्या या पाण्याखालील दुनियेचा खूप आंनद घेतला असता.
पण तळ्याजवळ कधी कधी अनेक मच्छिमारी जाळे घेऊन मासे पकडण्यासाठी येतात तेव्हा मात्र मी तर खूपच घाबरुन जाईन. कदाचित हे मासेमारी मला तर पकडून पाण्याबाहेर काडून मारून तर नाही टाकणार ना, अशी भीती सतत मला वाटत राहीली असती. आणि जरी मच्छिमारांनी माझा मित्रांना पकडले तरी देखील मला खूप वाईट वाटले असते.
काही वेळा या या तळ्याच्या आजूबाजूळून येनाजाणारी माणसे तळ्यात कचरा टाकून जातात. हा कचरा पाण्यात तसाच पडून राहतो व पाणी प्रदूषित होते. अशा पाण्यात आम्ही राहिलो तर माझाबरोबर पाण्यातील इतर जीवश्रुष्टी संपून जाईल. आम्ही मरून जाऊ.
अशा प्रकारे मी मासा असतो तर माझे जीवन मात्र खूप धोक्याचे झाले असते. खरंच मला समजले कि माझे मनुष्य जीवन किती सुखी आहे आणि आपण आपल्या स्वार्थासाठी जलश्रुष्टी चे जीवन कसे उध्वस्त करतो. आजपासून मी कचरा पाण्यात न टाकता त्याची योग्पद्धतीने विल्हेवाट लावेन आणि बाकी लोकांना सुद्धा हा संदेश देईन.
तर मित्रानो कसा वाटला हा If I were a fish essay in Marathi लेख, यात मी माझे “मासा असतो तर” या बद्दलचे विचार मांडले आहेत. तुम्हाला कसे वाटले हे कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी बरोबर शेअर करायला विसरू नका.