If trees are destroyed essay in Marathi मित्रानो तुम्ही झाडे नष्ट झाली तर या विषयावर निबंध शोधात आहात का? आम्ही या कल्पनात्मक निबंधावर हा लेख लिहला आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग जाणून घेऊया झाडे नष्ट झाली तर काय होईल.
If trees are destroyed essay in Marathi जर झाडे नष्ट झाली तर निबंध
If trees are destroyed essay in Marathi
झाड हे आपल्याला आपल्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी देते म्हणजेच प्राणवायू, अन्न, लाकूड अशा अनेक गोष्टी देते. झाड हे हवेतील कार्बन डायॉक्साईड सुद्धा शोषून घेते ज्यामुळे वातावरणातील हवा स्वच्छ राहते व आपण अशा स्वच्छ हवेत मोकळा श्वास घेऊ शकतो.
पण आपल्याला आवश्यक असणारे हि झाडे नष्ट झाली तर ?, झाडे नष्ट झाली तर आपल्याला खायला अन्न मिळणार नाही व आपल्यावर उपासमारीची वेळ येईल. झाडापासून मिळणारी विविध प्रकारची आंबट, गोड फळ आपल्याला खायला मिळणार नाहीत.
झाडांमुळे वाऱ्याने आणि पाण्याने होणारी मातीची धूप होत नाही कारण झाडांची मुळे मातीचे कण घट्ट पकडून ठेवतात परंतु झाडे नष्ट झाली तर मातीची धूप होऊ लागेल. अनेक आजारांना बरे करण्यासाठी लागणारे झाडांचा विविध अवयवांपासून बनलेली आयुर्वेदिक औषधे मिळणार नाहीत.
झाडे वातावरणातील कारखान्यातून, वाहनांतून सोडला गेलेला हानिकारक कार्बन डायॉक्साईड (CO2) वायू शोषून घेतात व वातावरणातील हवा स्वच्छ करतात पण जर झाडे नष्ट झाली तर वातावरणातील हवा दूषित होऊन जाईल ज्यामुळे अनेक श्वसनासंबंधित अनेक त्रास उद्भवतील.
घर उभारणी करताना लागणाऱ्या अनेक कामासाठी लाकूड मिळणार नाहीत. उन्हात चालून चालून थकल्यास झाडाचा खाली बसून आपण थंड सावलीत बसून विश्रांती घेऊ शकणार नाही.
झाडांच्या फांद्यांना झोपला अडकवून झोका घेण्याचा आनंद घेऊ शकत नाही. आपण जी पुस्तके वाचतो त्या पुस्तकांची पाने सुद्धा झाडांपासून बनलेली असतात, पण जर झाडे नष्ट झाली तर आपल्याला वाचायला पुस्तक मिळणार नाहीत.
आपल्या घरात जे खुर्ची, टेबल, दरवाजे, खिडक्या असतात ते सर्व झाडांच्या लाकडा पासूनच बनलेले असतात, पण जर झाडे नष्ट झाली तर आपल्याला यातले काहीच मिळणार नाही.
झाडे नष्ट झाली तर जंगले, अभयारण्ये सर्व रिकामे होऊन जातील व प्राणी आणि पक्षी अन्नासाठी व निवाऱ्यासाठी इथे तिथे हिंडत राहतील.
अशा प्रकारे झाडे हे जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी खूप गरजेचे आहे. झाडे नसतील तर सृष्टीतील संजीवांचे जगणे कठीण होऊन जाईल.
अशाप्रकारे मित्रानो या If trees are destroyed Essay in Marathi लेखात आम्ही झाडे नष्ट झाले तर काय होईल या बाबतीत कल्पनात्मक निबंध सांगितलं आहे. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हा कल्पनात्मक निबंध नक्कीच आवडला असेल.