Information about mother teresa in Marathi मित्रांनो, तुम्ही मदर टेरेसा बद्दल माहिती शोधत आहात ? या लेखात आम्ही मदर तेरेसाची सर्व माहिती दिली आहे. मदर तेरेसा या एक महान समाजसेविका ( social worker ) म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत.
Information about mother teresa in marathi
मदर तेरेसा यांच्या विषयी माहिती Mother teresa information :-
नाव | आंजेझे गोन्शे बोजॅक्सियू (anjeze gonxhe bojaxhiu) |
जन्म, जन्म स्थान | 26 ऑगस्ट 1910, मॅसेडेनिया |
धर्म | ख्रिश्चन |
काम | सामाजिक कार्यकर्ता, धर्मप्रसारक |
पुरस्कार | 1979 मध्ये नोबेल पुरस्कार, 1980 मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1962 साली पद्मश्री पुरस्कार |
मृत्यू | 5 सप्टेंबर 1997, कोलकाता |
मदर तेरेसा यांचा जन्म आणि परिवार Mother Teresa Birth and family :-
मदर तेरेसा यांचे खरे नाव आंजेझे गोन्शे बोजॅक्सियू (anjeze gonxhe bojaxhiu) असे आहे जे त्यांच्या जन्मावेळी ठेवण्यात आले होते. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी मॅसेडेनिया ( Macedonia ) येथे झाला होता.
मदर तेरेसा जन्मापासून मॅसेडेनिया ( १९१० ते १९२८) येथे राहत होत्या, नंतर त्या त्यांच्या शिक्षणासाठी आयर्लंड येथे गेल्या आणि नंतर तेथून त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या. त्यांनी त्यांच्या आयुष्याचा बराच कालावधी भारतात काढला.
मदर तेरेसा यांनी त्यांच्या लहानपणीच धार्मिक जीवन जगण्याचे ठरविले होते. लहानपणी त्यांनी घरीच गणित व विज्ञानाचे सामान्य ज्ञान घेतले. कारण त्यांच्या राज्यात मुलींना शाळेत जाण्याची परवानगी नव्हती.
यांच्या वडिलांचे नाव निकोली बोजॅक्सिओ असं होतं. ते एक अल्बानियन उद्योजक होते. मदर तेरेसा ही त्यांच्या वडिलांची धाकटी मुलगी होती. ती आठ वर्षाची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला.
मदर तेरेसा शिक्षण आणि कार्य Mother teresa education and work :-
मदर तेरेसा यांनी धर्मप्रसारक ( Missionary ) होण्यासाठी लागणाऱ्या इंग्रजी भाषा शिकण्यासाठी त्या सन 1928 ला वयाच्या 18 व्या वर्षी घर सोडून रॅथफोरहॅम, आयर्लंड येथे गेल्या. आयर्लंड नंतर त्या 1929 ला धर्मप्रसार करण्यासाठी भारतात आल्या.
त्या भारतात राजुरी येथे वेस्ट बंगाल मध्ये दार्जिलिंग येथे धर्मप्रसारक बनण्यासाठी प्रशिक्षण घेत होत्या. तेथेच त्या बंगाली भाषा शिकल्या आणि सेंट तेरेसा महाविद्यालयात शिकवीत होत्या.
त्यानी 1931 मध्ये पहिले धार्मिक वचन घेतले, त्याच वेळी त्यांनी त्यांचं नाव आंजेझे गोन्शे बोजॅक्सियू (anjeze gonxhe bojaxhiu) असे बदलून तेरेसा असे ठेवले. मदर तेरेसा या वीस वर्षे कोलकात्यामध्ये लाॅरेट कॉन्व्हेंट महाविद्यालयात शिकवित होत्या.
त्यांनी 1948 मध्ये लाॅरेट कॉन्व्हेंट महाविद्यालय सोडून गोरगरिबांचासोबत राहून त्यांची सेवा करण्याचे ठरविले त्यावेळी त्यांनी साधा पोशाख म्हणजेच पांढऱ्या साडी चा स्वीकार केला.
त्यांनी स्त्रियांच्या संघटना सोबत समाज सेवेचे कार्य करीत होत्या. त्यांना हे कार्य करताना सुरुवातीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.
सन 1950 मध्ये त्यांनी गोरगरीब, भुकेले, अपंग लोकांसाठी कोलकत्ता येथे मिशनरीज ऑफ चारिटी ( Missionaries of Charity ) ची स्थापना केली. मदर तेरेसा यांनी त्यांच्या आयुष्यातील भरपूर वर्षे गोरगरिबांच्या व दलित लोकांच्या सेवेत घालवली. त्यांनी सन 1952 झाली गरीब लोकांना राहण्यासाठी पहिली धर्म शाळा उघडली.
मदर टेरेसा यांनी सन 1982 साली हाईट ऑफ सीज ऑफ बीरूट येथे युद्धादरम्यान दवाखान्यात अडकलेल्या 37 मुलांना वाचविले.
तेरेसा यांनी अनेक देश विदेशात जाऊन गरजू लोकांना मदतीचा हात पुढे केला. त्यांनी पहिली मिशनारीज ऑफ चारिटी कोलकाता येथे सुरू केली. नंतर त्यांनी पुढे गरिबांचे मदतीसाठी जगभर अनेक ठिकाणी हजारो मिशनारीज ऑफ चारिटी स्थापन केल्या.
त्यांना त्यांच्या महान कार्यासाठी 1979 मध्ये नोबेल पुरस्काराने ( Nobel prize ) गौरविण्यात आले आणि 1980 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारने मदर तेरेसा यांना 1962 साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले.
अशा महान व्यक्तीचा 5 सप्टेंबर 1997 रोजी कलकत्ता येथे हृदयविकारामुळे निधन झाले. ख्रिश्चन धर्मामध्ये ( Christian ) मदर तेरेसा यांची पुण्यतिथी दिवस ‘फिस्ट डे’ म्हणून साजरा केला जातो.
मदर तेरेसा यांना मिळालेले पुरस्कार Mother teresa awards :-
पुरस्कार | वर्ष |
---|---|
नोबेल पुरस्कार | १९७९ |
भारत रत्न | १९८० |
पद्मा श्री | १९६२ |
पॅटरोनल मेडल | १९७९ |
आॉर्डर आॉफ मेरीट | १९८३ |
प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम | १९८५ |
टेम्प्लेटोन प्राईज | १९७३ |
ग्रॅंड ऑर्डर ऑफ क्वीन जेलेना | १९९५ |
काँग्रेशनल गोल्ड मेडल | १९९७ |
जवाहरलाल नेहरू पुरस्कार | १९६९ |
गोल्डन होनर ऑफ द नेशन | १९९४ |
पॅसेम ईन टेरीस | १९७६ |