5 सप्टेंबर शिक्षक दिन मराठी मध्ये भाषण

5 September teachers day speech in Marathi वाचक मित्रांनो, या लेखात आम्ही शिक्षक दिना वरील भाषण उपलब्ध करून देत आहोत. या लेखात अत्यंत सोप्या भाषेत शिक्षक दिनाचे व शिक्षकांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व पटवून दिले आहे. आशा करतो तुम्हाला हा लेख नक्की आवडेल. तसेच हा लेख तुम्ही शाळेमध्ये किंवा वक्तृत्व स्पर्धेत जसाच्या तसा किंवा बदल करून वापरू शकता.

5 September teachers day speech in Marathi
5-september-teachers-day-speech-in-marathi

5 सप्टेंबर शिक्षक दिन मराठी मध्ये भाषण 5 September teachers day speech in Marathi

सुप्रभात, आदरणीय मुख्याध्यापक, गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण येथे शिक्षक दिनाचे ( Teachers day ) औचित्य साधून एकत्र जमलो आहोत. अत्यंत कष्टाने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांचे कृतज्ञ भावनेने आभार व्यक्त करण्याचा आजचा हा महत्वाचा दिवस आहे.

आपल्या शाळेत दररोज केल्या जाणाऱ्या या प्रार्थनेतून आपण आपल्या गुरूंना ईश्वरा इतके महत्त्व देतो. स्वतः जवळ असलेले संपूर्ण ज्ञान वापरून आपल्याला घडवणारी व आपल्या भविष्यातील आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती म्हणजेच शिक्षक.

आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे कारण म्हणजे आजच्या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती ( India second president ) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता त्यांनी त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ शिक्षक म्हणून व्यतीत केला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी फिलॉसॉफी मध्ये बीए व एम. ए.शिक्षण पूर्ण केले होते व त्यानंतर पुढची तीस पेक्षा जास्त वर्ष त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये शिकवण्यात व्यतीत केली.

ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये ( Oxford university ) प्राध्यापक म्हणून शिकविणारे ते पहिले भारतीय होते. १९६२ साली त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासंदर्भात सुचवले असता ते म्हणाले की ५ सप्टेंबर हा माझा वाढदिवस शिक्षक दिन ( Teachers day ) म्हणून साजरा केला तर ते माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे असेल. तेव्हापासून भारतामध्ये पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षक हा प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारा व विद्यार्थ्याला अंतर्बाह्य बदलून टाकणारा तसेच विद्यार्थ्याला त्याच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवणारा महत्त्वाचा घटक आहे.

शिक्षक हा देशाच्या महत्त्वाच्या आधारस्तंभापैकी एक आहे. ते विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात तसेच त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम माणूस बनवण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या यशस्वी वाटचाली मध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच एपीजे अब्दुल कलाम यांसारखे व्यक्तींनी शिक्षक या शब्दाचा खरा अर्थ पटवून दिला.

शिक्षक हे फक्त शाळेत किंवा वर्गातच नसतात तर आपल्या सभोवताली असणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. आपले मित्र, नातेवाईक, निसर्ग, प्राणी तसेच आपण आपल्या चुकांमधूनही काहीतरी शिकत असतो

भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकांचा आदर करण्याचे दोन दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा व शिक्षक दिन

शिक्षक दिना दिवशी डॉक्टर राधाकृष्णन, अब्दुल कलाम डॉक्टर आंबेडकर अशा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विभूतींच्या प्रतिमांना सजावट करून त्यांचा आदर केला जातो.

शिक्षकांच्या अमूल्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांचे भाग्य उजळून निघाले अशी अनेक उदाहरणे ही आपल्याच मातीतील आहेत. अगदी निवृत्तीनाथ-ज्ञानदेवांपासुन ते रमाकांत आचरेकर व सचिन तेंडुलकर अशा अनेक गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रख्यात आहेत.

प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षकाचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे बरेचदा पुस्तकेसुद्धा एका उत्तम गुरूची भूमिका बजावत असतात व आपल्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम करीत असतात म्हणूनच काही ठिकाणी ग्रंथ हेच गुरु या उक्तीप्रमाणे या दिवशी पुस्तकांची पूजा केली जाते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे पण ते पाजण्याचे कर्तव्य मात्र शिक्षक बजावत असतो. शिक्षक हे रस्त्याप्रमाणे एकाच जागी राहून आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतात. अज्ञानाच्या अंधकाराने दाटलेल्या वाटेला ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून टाकतात. शिक्षक विद्यार्थ्याला त्याच्या भविष्याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतात.

असं म्हणतात की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला की युद्धावेळी तेवढे रक्त कमी सांडावं लागतं, याच शांततेच्या काळात शिक्षक स्वतः घाम गाळून विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असतात. युद्धावेळी आपलं जास्त रक्त खर्ची पडणार नाही याची तेच काळजी घेत असतात.

अशा या माझ्या आदरणीय शिक्षकांनी आमच्यावर केलेली कृपादृष्टी शब्दात मांडणे शक्य होणार नाही कारण हे शब्द सुद्धा त्यांनी दिले व लिहिण्याची समजही त्यांनी दिली.

अशा या ईश्वरस्थानी असलेल्या माझ्या सर्व शिक्षकांचे त्यांच्या अमूल्य मार्गदर्शना बद्दल आभार मानतो व माझे हे दोन शब्द इथेच संपवतो

हे सुद्धा अवश्य वाचा:-

Share on:

Leave a Comment